
नेवासा – तोतया पत्रकारांवर कारवाई करण्याची मागणी नेवासा प्रेस क्लबची कडून करण्यात आली आहे याबाबत पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की, सध्या तालुक्यात वाहनांवर व ईतरत्र शासकीय कार्यालयात प्रेस नावाचा व पत्रकार पदाचा गैरवापर करणाऱ्या तोतया पत्रकारांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट असून लोकशाहीचा आधारस्तंभ बदनाम करणाऱ्या या बोगस पत्रकारांवर कारवाई करण्यात यावी.

तालुक्यात नुकत्याच एका तोतया पत्रकारावरती अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे तालुक्यात काही प्रमाणात तोतया पत्रकार वावरत आहे हे सिद्ध झाले. दुचाकी, चारचाकी वाहनांवर प्रेस असे लिहून पत्रकार असल्याचे भासवून प्रेस नावाचा गैरवापर करून शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना तोतया पत्रकार ब्लॅकमेलिंग करत आहे.

बोगस पत्रकारितेच्या नावाखाली विविध सरकारी अधिकारी यांना नाहक त्रास देण्याचा प्रकार देखील सुरू आहे. तालुक्यात व शहरात वाहनांवर प्रेस नाव टाकून वापर करणाऱ्या वाहनांवर तत्काळ कारवाई करावी व तोतया पत्रकारिता करणाऱ्यांवर योग्य कारवाईची मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी आज आम्ही प्रेस क्लब च्या वतीने करत आहोत यावेळी अध्यक्ष गुरुप्रसाद देशपांडे, मोहन गायकवाड, उपाध्यक्ष कैलास शिंदे, नाना पवार, अशोक डहाळे, रमेश शिंदे, शाम मापारी, सुधीर चव्हाण, सुहास पठाडे, मकरंद देशपांडे, पवन गरुड, शंकर नाबदे, अभिषेक गाडेकर उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







