आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
सायकल

पाचेगाव फाटा – आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर सहकार पंढरी पाचेगाव येथून गुड मॉर्निंग” एक्सरसाईज ग्रुपच्या वतीने काल दि १०जुलै वार शुक्रवारी पहाटेच्या वेळेस गावातील ग्रामदैवत श्री गहिनीनाथ महाराजांच्या आशीर्वादाने पलायन झाले.
१०ते १२ जुलै २०२६ या कालावधीत पाचेगाव ते पंढरपूर सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तीमय वातावरणात निघणारी ही सायकल दिंडी पंढरपूर येथील ऐतिहासिक आणि मानाच्या सायकल रिंगणातही विशेष सहभाग नोंदवणार असल्याची माहीती दिंडीचे प्रमुख डॉ वाल्मिक तुवर,व भास्कर शिंदे यांनी दिली.

सायकल


गेल्या काहिक वर्षापासून आषाढी वारीमध्ये सायकल वारीचे आकर्षण मोठया प्रमाणावर वाढले आहे. पाचेगाव गुड मॉर्निंग”एक्सरसाईज ग्रुप’च्या वतीने काढण्यात आलेल्या या सायकल वारीचे यंदाचे हे सलग दूसरे वर्ष आहे. प्रदूषणमुक्त पर्यावरण आणि ‘धावपळीच्या युगात निरोगी आरोग्यासाठी सायकल चालवा हा सामाजिक संदेश घेऊन हे सायकल वारकरी पंढरीच्या दिशेने पेंडल मारत आहे. या ग्रुपने यापूर्वी अनेक ठिकाणी धार्मिक वारीचे यशस्वी नियोजन केले आहे. तसेच हा ग्रुप दैनंदिन ३० किलोमीटर सायकल प्रवासासोबतच गावातील सामाजिक उपक्रम देखील राबवित आहे.

सायकल


यंदाच्या या पंढरपूर सावकल दिंडीमध्ये एकूण २० सायकल वारकरी विटूनामाच्या जयघोषात सहभागी झाले आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांपासून ते तरुण सायकलपटूंचा समावेश आहे. वारी दरम्यान कोणतीही वाहतूक कोंडी होऊ नये आणि सर्व वारकऱ्यांची सुरक्षा अबाधित राहावी, यासाठी ग्रुपच्या वतीने शिस्तबद्ध ‘सिंगल लाईन सायकल चालवण्याची नियमावली तयार करण्यात आली आहे. सर्वांसाठी एकसमान पोशाख आणि सुरक्षेसाठी हेल्मेट सक्तीचचे करण्यात आले आहे.
या सायकल वारीदरम्यान वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, म्हणून दिंडीसोबत एक बॅकअप वाहन देखील असणार आहे. यामध्ये प्रथमोपचार किट, आणि आवश्यक औषधे तसेच लांबच्या प्रवासात सायकल खराब झाल्यास ती जागेवरच दुरुस्त करण्यासाठी तांत्रिक साहित्य बरोबर घेतले आहे.

सायकल


दिनांक १० जुलै २०२६ रोजी पहाटे ५:०० वाजता गावचे ग्रामदैवत श्री गहिनीनाथ महाराजांना अभिषेक आणि आरती करून ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. पाचेगाव ते करमळा १६० किलोमीटर अंतर पार करून पहिला मुक्काम करमळा या ठिकाणी रात्रीच्या भोजनासाठी व मुक्कामासाठी सुखरूप सायकल दिंडी वारकरी विसावेल आहे. आज दुसऱ्या दिवशी करमळा ते पंढरपूर दुसरा मुकाम ९५ किलोमीटर अंतरावर चार वाजेच्या सुमारास पंढरपूर मध्ये दाखल व
संध्याकाळी पंढरपूर मध्ये भव्य सायकल स्नेहसंमेलन
दिवस,तिसरा दिवस म्हणजे उद्या रविवार विठ्ठल रुक्माई मंदिर प्रदक्षिणा व भव्य रिंगण सोहळ्यात सायकल स्वार सामील होऊन आनंद घेणार,त्यात उत्कृष्ठ सायकलस्वरांना सन्मानित करण्यात येणार आहे.

सायकल


सर्व सायकल स्वरांना मार्गदर्शन डॉ वाल्मीक तुवर अध्यक्ष भास्कर शिंदे,सचिव अक्षय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मिळणार आहे, तसेच सायकल वारी आयोजक श्रीरामपूर सायकलिंग क्लब अध्यक्षा डॉ वैशाली बधे,डॉ संकेत मुंदडा,देवेंद्र दुप्पड श्री साठे,
सौरभ मेहत्रास,हर्षद महाजन आदींच्या मार्गदर्शनाखाली या सायकल दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

सायकल

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सायकल
सायकल
सायकल

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सायकल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!