आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
सोसायटी

नेवासा | अविनाश जाधव – तालुक्यातील शिरेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. ची वार्षिक सर्वसाधारण सभा (जनरल मीटिंग) खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

शनिवारी सोसायटीच्या गोडाऊनमध्ये ही सभा सर्व सभासदांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या सभेत विषय पत्रिकेवरील १ ते १३ विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

सोसायटी

ही सभा सोसायटीचे अध्यक्ष धनराज तुवर, उपाध्यक्ष चंद्रभान बोर्डे, सचिव शिवाजी जंगले आणि सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत पार पडली.

सभासद श्री. सुरेश गिताराम जाधव यांनी सोसायटीच्या डुप्लिकेट लेटर पॅडवर खोटे शिक्के तयार करून चेअरमन व सचिव यांच्या बनावट सह्या केल्या, सोसायटीचा बोजा कमी करून इतर बँकेचे कर्ज घेऊन सोसायटीची फसवणूक केली, तसेच सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना धमकी देणे, कर्मचाऱ्यांना फोन लावून त्याचे रेकॉर्डिंग करणे व ते रेकॉर्डिंग सोशल मीडियावर प्रसिद्ध करणे, सोसायटीची व सभासदांची बदनामी होईल असा मजकूर सोशल मीडियावर टाकणे आणि सोसायटीच्या विरोधात वेळोवेळी विनाकारण तक्रार अर्ज देणे, अशा स्वरूपाचे गैरकृत्य केल्याचे निदर्शनास आले.

सोसायटी

या कारणास्तव महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ३५ अन्वये श्री. सुरेश गिताराम जाधव यांचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. तसेच, काही सभासद दोन ठिकाणी संस्थेत सभासद असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांचेही सभासदत्व बहुमताने रद्द करण्यात आले.

किरकोळ वाद वगळता संपूर्ण सर्वसाधारण सभा सुरळीत पार पडली. उपस्थित सभासदांचे आभार सोसायटीचे तज्ञ संचालक डॉ. रमेश जाधव यांनी मानले.

सोसायटी
सोसायटी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सोसायटी
सोसायटी
सोसायटी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सोसायटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: Content is protected !!