माजी आ शंकरराव गडाख यांच्या सहकार्यातून साकारलेल्या मुंबादेवी मंदिराचे लोकार्पण.
सोनई – टोका ता नेवासा येथील मुंबादेवी मंदिराचे सदस्य वर्षानुवर्षे पत्र्याच्या शेडमध्ये श्री गणेश ,दुर्गा माता,भगवान दत्तात्रय, ओटेश्वर महादेव यांची नियमित पूजा करायचे तसेच येथेच सर्व ग्रामस्थ यांना सोबत घेऊन गणपती उत्सव व नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात यायचा परंतु मंदिराचे बांधकाम नसल्याने पाऊस,ऊन असेल तर अनेक वेळा धार्मिक कार्यक्रमात व्यत्यय यायचा सदर ठिकाणी मंदिराचे बांधकाम आवश्यक आहे हे लक्षात येताच तात्काळ टोका ग्रामस्थ यांना सोबत घेत माजी आ शंकरराव गडाख यांनी मुंबादेवी मित्रमंडळ यांच्याशी चर्चा करून मंदिर उभारणीस सहकार्य केले.
या मंदिरात गुरू दि 12 डिसेंबर 2024 रोजी श्री गणेश,दुर्गा माता,भगवान दत्तात्रय,ओटेश्वर महादेव यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तसेच याप्रसंगी मुंबादेवी मित्रमंडळाच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आले. याप्रसंगी कडूबाळ रासने,रमेश गंगुले,नितीन लहिरे,संदीप लहिरे,राजेंद्र बिरुटे,सुनील कुंढारे आदी उपस्थित होते.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.