ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
वाळू

नेवासा – आज दिनांक. 06/05/2025 रोजी मा. पोलीस उप अधीक्षक यांना गोपनीय माहिती मिळाली की, मौजे प्रवरासंगम शिवारात अशोक लेलँड कंपनीच्या चार चाकी वाहनामध्ये अवैधरित्या वाळू वाहतूक होत आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने लागलीच पोलीस स्टॉप व पंच असे प्रवरासंगम शिवारात मिळालेल्या माहितीच्या आधारे पेट्रोलिंग करत असताना त्यांना प्रवरासंगम ते देवगड रोडवर एक संशयित अशोक लेलँड कंपनीचे चार चाकी वाहन पाठीमागील बाजूस पिवळी ताडपत्री लावून जात असताना दिसले

वाळू

सदर वाहनास पोलीस स्टाफ यांनी थांबवून वाहन चालकास पोलीस स्टाफ व पंचांची ओळख करून त्याचे नाव गाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव दीपक रमेश पिटेकर वय 32 रा. नेवासा खुर्द तालुका नेवासा असे सांगून त्यास झडतीचा उद्देश समजावून सदर चार चाकी वाहनाच्या पाठीमागील ताडपत्री उचकावून पंचा समक्ष पाहणी केली असता सदर वाहनाच्या पाठीमागील बाजूस हौद्या मध्ये 1 ब्रास वाळू दिसून आली सदर वाळू वाहतूक परवाना बाबत चालकास विचारणा केली असता त्याने कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याबाबत पंचसमक्ष कळविल्याने सदर अशोक लेलँड कंपनीचे अवैधरीत्या वाहतूक करणारे वाहन MH 20 EG 5781 व 1 ब्रास वाळू असा एकूण.5,06,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करण्यात आला असून आरोपी नामे दीपक रमेश पिटेकर वय 32 रा. नेवासा खुर्द तालुका नेवासा याच्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल श्रीनाथ गवळी यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे नेवासा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

वाळू

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कुलूबर्गे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव श्री सुनील पाटील, प्रभारी अधिकारी नेवासा मा. पोलीस उप अधीक्षक श्री संतोष खाडे, पोलीस हवालदार अजय साठे, पोलीस कॉन्स्टेबल श्रीनाथ गवळी, गणेश जाधव, आप्पा तांबे, अवि वैद्य, सुमित करंजकर यांच्या पथकाने केली आहे.

वाळू
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वाळू
वाळू
वाळू

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वाळू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *