ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
आरटीओ

नेवासा – पोलीस स्टेशन बीड ग्रामीण येथ फिर्यादी गणेश जयराम विघ्ने मोटार वाहन निरीक्षक, उप प्रादेशिक परीवाहन कार्यालय बीड यांनी फिर्याद दिली की, बीड बायपाय रोड येथे दोन ईसम गणवेश धारण करुन परीवहन विभागाचे लोगो व कार्यालयात वापण्यात येणाऱ्या हुबेहुब दिसणाऱ्या स्कॉर्पीओ वाहनाचा उपयोग करुन खोटा लोकसेवक असल्याचा बनावा करुन त्यांचे कडुन बेकायदेशीर रित्या लोकांकडुन पैसे वसुल करीत आहे अश्या फिर्यादी प्रमाणे गु.र. नं१२८/२०२५ कलम 204, 318 (4), 205,126(2) भा. न्या. सं प्रमाणे दोन आज्ञात आरोपीतांविरुध्द गुन्हा नोंद झाला होतो. वर नमुद आरोपींचा शोध घेण्याबाबत मा. पोलीस अधिक्षक बीड यांनी निर्देश दिले होते व मा.पो.नि. सा. स्था.गु.शा.बीड यांनी आदेशीत केले होते.

आरटीओ

यावरुन आज दि. 08/05/2025 रोजी चे 08.45 वा आम्ही व सोबत पोहवा मनोज वाघ/13, पोहवा कैलास ठोंबरे /568, पोना विकास वाघमारे/1333, चापोहवा शिवाजी खवतड /1250 असे सरकारी वाहन क्र.एम.एच.23 ए.फ.0093 ने आरोपी शोधकामी रवाना झालो होतो. सदर गुन्हयातील वाहनाचा वाहन क्रमांक फिर्यादीवरुन प्राप्त झाला होता. सदरचा वाहन क्रमांक आम्ही गोपनिय बातमीदाराना देवुन वाहनाबाबत माहीती घेण्याचे सांगितले होते. आम्ही गेवराई उविभागात आरोपीचा शोध घेत असताना गोपनिय बातमीदारामार्फत खात्रीलायक बातमी मिळाली की, सदरचे वाहन हे तलवाडा फाटा येथे उभे असुन त्यात दोन ईसम बसलेले दिसत आहेत. यावरुन आम्ही तलवडा फाटा येथे अचानक पणे उभ्या असलेल्या वाहनाजवळ 12.00 वाजता गेलो. सदर वाहनात ड्रायव्हर सिटवर एक ईसम बसलेलर मिळुन आला व त्याचे बाजुचे सिटवर एक ईसम गणवेश परीधान करुन बसलेला दिसला.

आरटीओ

त्यास आमचा परीचय दिला व त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव अजय राजाराम सुर्यवंशी सहा. मोटार वाहन निरीक्षक, वडाळा असे सांगितले व सांगितलेल्या नावाची नेम प्लेट त्याने परीधान केलेल्या गणवेशावर दिसुन आले. ड्रायव्हर सिटवर बसलेल्या ईसमाचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव दिनेश मंगल धनसर वय 38 वर्षे रा. खोली क्रं.03 पांडुरंगवकीलवाडी, कलीना, मुंबई. असे सांगितले. वर नमुद दोन्ही -ईसमांना वाहनाचे खाली उतरण्याचे सांगितले असता दोन्ही ईसम वाहनाचे खाली उतरले. त्यांना आपण वडाळा येथे कार्यरत असुन येथे काय करत आहात असे विचारले असता सुरुवातीस तो गरबडला व तुम्हाला काय करायचे आहे असे म्हणु लागला. त्यास त्याचे कार्यालयीन ओळखपत्राबाबत विचारणा केली असता यातील ड्रायव्हर दिनेश धनसर यास संशय आल्याने त्याने आमचे सोबत असलेला पोलीस पार्टीस धक्का दिला व पळु लागला. त्याचा काही अंतर पाठलाग करुन पोहवा मनोज वाघ यांनी पकडले.

आरटीओ

त्यांना दोघांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता यातील अजय राजाराम सुर्यवंशी याने सांगितले की, माझे खरे नाव – अजय बालाजी गाडगे वय -24 वर्षे रा. अम्रत नगर, डगलॅड, खंडोबा टेकडी, घाटकोपर, मुंबईअसे असुन मी कोणत्याही शासकीय पदावर कार्यरत नाही. मी मागील 10 दिवसापुर्वी मलाड येथुन पांढऱ्या रंगाची स्कॉर्पीओ गाडी जि खरा वाहन क्रमांक एम.एच.47 ए.बी.3639 विकत घेतली होती. सदरचे वाहन हे मी हुबेहुब आर.टी. कार्यालयात वापरण्यात येणाऱ्या वाहनासारखे बनवणार असल्याने तिला घाटकोपर येथील वाधवा पार्कीगय कव्हरने झाकुन उभि केली होती. रोज सदर पार्कीग मध्ये थोडे थोडे करुन मी सदर वाहनास आर.टी.-कार्यालयात वापरण्यात येणाऱ्या वाहनासारखे बनवले.

आरटीओ

व तीला घेवुन मी माझे भाऊजी सोबत दोन दिवसापू घाटकोपर येथुन निघुन नाशीक, शिर्डी, अहील्यानगर व बीड येथे वाहन अडवुन त्यांना मी आर.टी.ओ असल्या भासवुन त्यांची फसवणुक करुन त्यांचे कडून रोख व ऑनलाईन रक्कम घेतली आहे. यावरुन सदर ईसमाने गु केला असल्याचे कबुल केल्याने त्याचे ताब्यातुन गुन्हा करतेवेळी वापरण्यात आलेले वाहन व रक्कम ज करणे असल्याणे दोन पंचाना तलवडा फाटा येथे बोलावुन वर नमूद प्रमाणे सर्व हकीकत सांगितली. आरोप पंचासमक्ष रोख रक्कम कोठे ठेवली आहे याबाबत विचारणा केली असता सदरच रक्कम ही गाडीचे डॉश मध्ये ठेवल्याचे सांगितले. यावरुन दोन पंचासमक्ष गाडीची व आरोपीतांची झडती घेतली असता त्यांचे ताब्या खालील वर्णनाचा मुद्येमाल मिळुन आला.

1) किं.43,000/- रु रोख: पाचशे रुपये चलनी दराच्या 86 नोटा किंमती 43,000/- रु

2) किं.65,000/- रु एक अॅपल कंपनीचा अॅपल 15 मोबाईल फोन ज्यात जियो कंपनीचे सिन क्र.8591492649 असलेले. (आरोपी अजय बालाजी गाडगे याचे अंगझडतीत)

3) किं.20,000/- रु; एक विव्हो कंपनीचा V 25 अॅनड्राईड फोन ज्यात व्होडाफोन कंपनीचे सि क्रं.9594951238 असा असलेला. ( आरोपी अजय बालाजी गाडगे याचे अंगझडतीत सद नंबर वरुन आरोपीन लोकांकडुन ऑनलाईन पैसे घेतलेला)

4) किं. 20,000/- रु एक सॅमसंग कंपनीचा पोपटी रंगाचा अॅनड्राईड फोन ज्यात व्होडाफो कंपनीचे सिम क्रं. 983317226 असा असलेला. ( आरोपी दिनेश धनसर याचे अंगझडतीत)

आरटीओ

5) किं. 10,000/- रु एक वनप्लस कंपनीचा पोपटी रंगाचा अॅनड्राईड फोन ज्यात व्होडाफो कंपनीचे सिम क्रं.9022640126 असा असलेला. ( आरोपी दिनेश धनसर याचे अंगझडतीत)

6) किं. 1000000 रु:- एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पीओ गाडी जिचे दोन्ही बाजुस आर.टी.ओ चे लोगो आर.टी.ओ लिहलेले व टपावर दिवा लावलेली असलेली जिच्या समोर व मागील बाजुस खोन वाहन क्र.एम.एच.04 के. आर. 6404 असा असलेली.

7) किं.00/- रु – दोन वाहन क्रं.एम.एच.47 ए.बी.3639 अस असलेल्या नंबर प्लेट. असा एकुण 11,58,000/-रुपयाचा मुद्येमाल पंचासमक्ष जप्त करुन ताब्यात घेतला.

तरी ईसमनामे 1) अजय बालाजी गाडगे वय 24 वर्षे रा.अम्रत नगर, डगलँड, खंडोबा टेकर्ड घाटकोपर, मुंबई 2) दिनेश मंगल धनसर वय 38 वर्षे रा. खोली क्रं.03 पांडुरंगवकीलवाडी, कलीन -, मुंबई. यांनी पोलीस स्टेशन बीड ग्रामीण गु.र. नं१२८/२०२५ कलम 204,318(4), 205, 126 (2) भा.न्या. चा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेवुन पुढील कारवाई होणेस विनंती आहे.

आरटीओ
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आरटीओ
आरटीओ

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आरटीओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *