एकता पत्रकार संघ

नेवासा – नेवासा तालुका एकता पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदि पुन्हा एकदा संदीप गाडेकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

दि. 6 जानेवारी रोजी नेवासा फाटा येथील श्रीराम सेवा साधक आश्रमात पत्रकार दिना निमित्ताने पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. आश्रमाचे महंत सुनीलगिरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

एकता पत्रकार संघ

या वेळी मंचावर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे, उदयन दादा गडाख,नवनिर्वाचित नगर पंचायत चे डॉ. करणसिंह घुले ,नेवासा पोलीस ठाण्याचे पि. आय.महेश पाटील,प्रविण तिरोडकर,किशोर जोजार, अॅड. अशोक कर्डक, एकता पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष बाळकृष्ण पुरोहित हे होते.

नेवासा टाइम्स चे प्रविण तिरोडकर यांना त्यांच्या उत्कृष्ट लेखनी बद्दल उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देण्यात आला. शेवटी सर्वांच्या उपस्थितीत आजपर्यंत तालुक्यातील सर्वच श्रेत्रात ठसा उमटवणारे तसेच सर्व पत्रकारांच्या हाकेला साद देणारे संदीप भाऊ गाडेकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

एकता पत्रकार संघ

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी तालुक्यातील विविध वृत्तपत्राचे संपादक, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनेक दिवसांपासून पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आपण कायमस्वरूपी कटीबद्ध राहु. तसेच पत्रकार भवनाचा प्रश्न देखील मार्गी लावु. – संदीप गाडेकर, अध्यक्ष, नेवासा तालुका एकता पत्रकार संघ.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

एकता पत्रकार संघ
एकता पत्रकार संघ

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

एकता पत्रकार संघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!