अपघात

रुग्णांच्या नातेवाईकांचा उघड आरोप! चौकशीची मागणी

नेवासा – दैनंदिन घडणाऱ्या रस्ता अपघातातील अनपेक्षेतीत घटनेतून अपघातग्रगस्त जखमींवर त्यांना तातडीने उपचार मिळण्यासाठी रुग्णवाहिकेच्या चालकांपासून तर थेट जखमींवर इलाज करण्यापर्यंत रुग्णणालयातील साखळी पद्धतीच्या वाढलेल्या टक्केवारीच्या मनसुब्यामुळे आता जखमी रुग्णनांची मोठी चांगलीच फडफजिती सुरु असल्याची वास्तव चर्चा सध्या रुग्णांच्या नातेवाईकांतून चर्चेली जात असून या टक्केवारीच्या लफड्यातून अपघातग्रस्त जखमींवर आरोग्याच्या इलाजासाठी खेळखंडोबा होवून बसला असल्याचा आरोप आता रुग्णांच्या नातेवाईकांतून उघडपणे केला जात असून जखमी रुग्णांच्या घरच्यांना मात्र या घटनेतून चांगलाच अर्थिक भुर्दंड बसत असल्याचेही आता उघडपणे बोलले जात असून मानवाच्या इलाजासाठी तरी आता वैद्यकिय मंडळीनी ‘निदान’ करतांना आपल्या संवगड्याची अर्थिक ‘सोय’ न लावता रुग्णांची फडफजिती थांबून वेळीच उपचार करण्याची मागणी नातेवाईकांनातून केली जात आहे. अहिल्यानगर – छत्रपती संभाजीनगर या महामार्गांवर रस्ता खराबीमुळे दैनंदिन रस्ते अपघातात मोठी वाढ झालेली असतांना या रस्ता अपघातातील जखमीना वेळेवर उपचार मिळण्यासाठी सर्वप्रथम सरकारी दवाखान्यात या रुग्णनांना घेवून जावे लागत असल्यामुळे आणि तेथून पुढे पुढील उपचारासाठी जखमींना खासगी दवाखान्यात हलविण्यात येते मात्र या जखमीना पुढील उपचारार्थ नेमके कोणत्या रुग्णालयात पुढे हलविण्यासाठ याच साखळी पद्धतीच्या ‘आर्थिक’ टक्केवारीतुन मात्र रुग्ण वेदनेने तडफडत असतांनाही त्यांना पुढील उपचारार्थ हलविण्यासाठी पुढची ‘सेटिंग’ लागेपर्यंत या रुग्णनांची प्रचंड हेळसांड होतांना दिसून येत असल्याच्या तक्रारी आता दस्तुरखुद्द रुग्णांच्या नातेवाईकांकडूनच केल्या जात असल्यामुळे आरोग्य खात्याने आता या गंभीर घटनेची दखल घेण्याची गरज असल्याचे मत काही जाणकार मंडळींतून व्यक्त केली जात आहे. रस्ता अपघात झाल्यानंतर सर्वप्रथम रुग्णवाहीका त्यानंतर सरकारी दवाखाना आणि पुढे जखमींना उपचारासाठी नेमके कुठे हलवायचे? याचे सर्वसूत्रच रुग्णवाहीका चालक आणि प्रथमोपचार करणाऱ्या डॉक्टर यांच्याच मनावर असल्यामुळे टक्केवारीची पहिली ‘सेटिंग’ झाल्यानंतरच संबंधित जखमी रुग्णपुढे हलविण्यात येत असल्याची गंभीर बाब समोर आल्याचा आरोप आता रुग्णनांच्या नातेवाईकांतूनच केला जात असल्यामूळे याची गंभीर दखल घेण्याची मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे

अपघात
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अपघात
अपघात

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अपघात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!