नेवासा-महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपीस मे.मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दि. ३० नोव्हेंबर २०२४ रोजी गुन्हा क्र. ४९१/२०२४ अन्वये सांगवी पोलीस स्टेशन, पुणे येथे आरोपी आकाश शिंदे यास अटक करण्यात आली होती. सदर आरोपी हा गेल्या एक वर्षाहून अधिक कालावधीपासून न्यायालयीन कोठडीत होता.
आरोपीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. या जामीन अर्जावर अॅड. नकुल दत्तात्रय झगरे पाटील यांनी कामकाज पाहिले असून त्यांना अॅड. प्रसन्न शहाणे यांनी सहकार्य केले.
आरोपीच्या वकिलांनी केलेला सविस्तर युक्तिवाद ऐकून व त्यास मान्यता देत माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दि. २०/०१/२०२६ रोजी आरोपी आकाश शिंदे यास जामीन मंजूर केला.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

