आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
पंचनामे

नेवासा : तालुक्यात संपूर्ण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाकडून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने सोयाबीन, कपाशी, बाजरी आणि मका यांसारखी पिके करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने पंचनामे सुरू केले असले, तरी शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती.

पंचनामे

नेवासा तालुक्यात यंदा अती कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. पावसाअभावी शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केल्यानंतर महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून संयुक्त पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.

पंचनामे

तहसीलदार संजय बिरादार यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
तहसीलदार संजय बिरादार यांच्या नेतृत्वाखाली महसूल प्रशासनाने शेताच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शिरसगाव येथील शेतकरी ज्ञानेश्वर देशमुख यांच्या शेतातील पिकांची पाहणी करण्यात आली. यावेळी शिरसगाव येथील गट क्रमांक ७० मध्ये पीक नुकसानीची पाहणी करण्यात आली.
या पाहणीप्रसंगी शिरसगाव कृषी सहाय्यक रामसिंह ठाकूर सोसायटीचे चेअरमन राजू पोटे, संतोष पोटे, शंकर देशमुख, बापुराव देशमुख, शेतकरी ज्ञानेश्वर देशमुख, ग्राम महसूल अधिकारी अक्षय खरपुडे, तहसील कर्मचारी योगेश मिसाळ आणि पोलीस पाटील गणेश सोमोसे उपस्थित होते.

पंचनामे

शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे प्रशासनाचे आवाहन
तहसीलदार संजय बिरादार यांनी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक पाहणी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. तसेच मोबाईल पिक पाहणी ॲप द्वारे शेतकऱ्यांनी पिक पाहणी करावी आव्हान त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये प्रशासनाने पंचनामे सुरू केले असून, पीक नुकसानीची पाहणी करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
तालुक्यातील एकही बाधित शेतकरी या पंचनामे प्रक्रियेपासून वंचित राहणार नाही, असे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी बोलताना सांगितले.

पंचनामे

त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पावसाअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. प्रशासनाकडून पंचनामे सुरू झाले असले, तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. तसंच नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंघे बोलताना म्हणाल की एकही बाधित शेतकरी या पंचनामेपासून वंचित राहणार नाही शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पंचनामे होतील असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

पंचनामे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पंचनामे
पंचनामे
पंचनामे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पंचनामे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!