प्रवरासंगम-अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा प्रवरा संगम चे मॅनेजर अनिल शेजुळ दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी प्रदीर्घ 35 वर्ष सेवा करून निवृत्त झाले त्याप्रसंगी माजी कुलगुरू डॉक्टर अशोकराव ढगे यांनी त्यांचा सन्मान केला डॉक्टर ढगे म्हणाले की शेजुळ यांनी ग्राहकांची सेवा हाच धर्म समजून कार्यभार सांभाळा ही अत्यंत आजच्या काळातील महत्वपूर्ण व अभिमानास्पद घटना आहे बचत गटासाठी कष्टाचे काम करून अनेक प्रश्न मार्गी लावले तसेच वसुली सारख्या महत्त्वपूर्ण कामात योगदान देऊन भरीव वसुली बँकेला मिळवून दिली. शेतकऱ्यांची सुद्धा त्यांनी प्रकरणे मंजूर करून दिलासा दिला. याप्रसंगी देवगड शाखेचे शाखा अधिकारी विकास लिपने वैभव निकम श्रीमती मोहिनी शेळके, प्रगतशील शेतकरी हरिभाऊ ढगे, सुनील कुमावत हजर होते मॅनेजर पदाचा पदभार भाऊसाहेब परभणे यांनी स्वीकारल्यानंतर त्यांचाही स्वागत सत्कार डॉक्टर ढगे यांच्या हस्ते करण्यात आला


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

