हद्दपार

नेवासा – आगामी येणाऱ्या सण उत्सव तसेच निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जानेवारी २०२६ मध्ये अप्पर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर विभागातील ३४ इसमाविरुद्ध – हद्दपारीच्या कारवाईचे प्रस्ताव जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे पाठविण्यात आले आहेत.

आगामी सण, उत्सव आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगाराविरुद्ध झिरो टॉलरन्स धोरण स्विकारले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सक्रिय गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्याप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी नोव्हेंबर व डिसेंबर २०२५ मध्ये श्रीरामपूर विभागातील उत्तर नगर जिल्ह्यातील १७ पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील मागील दहा वर्षातील सर्व गुन्हेगारांचा सविस्तर क्राईम डेटाबेस तयार केला आहे. त्यामधील सक्रीय य व क्रियाशील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक कारवाईसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगाराचा मागोवा घेण्यासाठी या डाटाबेसचा उपयोग होणार आहे.

हद्दपार

जानेवारी २०२६ मध्ये याच मोहिमेंतर्गत मानवी जीवितास किंवा मालमत्तेस धोका निर्माण करणाऱ्या किंवा तसा संभव असणाऱ्या व्यक्तींवर मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५, ५६ च्या तरतुदीनुसार श्रीरामपूर शहर योगेश सचिन गुंजाळ (वय २३, गायकवाड वस्ती, बेलापूर बुद्रुक), भारत विष्णू धोत्रे (वय ३०, बाजारतळ, श्रीरामपूर), तंजील गफार खान (वय २५, हुसेननगर, वॉर्ड नं१, श्रीरामपूर), प्रशांत संजय थोरात (वय२७, इंदिरानगर, शिरसगाव), श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे मनोज यशवंत पवार (वय २४, टाकळीभान), राहुरी पोलीस ठाणे रिफ गफूर शेख (पिंपरी अवघड), अक्षय मच्छिंद्र कुसमडे (वांबोरी), करण भरत माळी (एकलव्य वसाहत, राहुरी), योगेश सोपान बाचकर (बारागाव नांदूर), कोपरगांव शहर वैभव मुकेश कुऱ्हाडे (इंदिरानगर, ता. कोपरगाव), अनिकेत गणेश जाधव (गांधीनगर, कोपरगाव), योगेश सुरेश गायकवाड (गांधीनगर, कोपरगांव), कोपरगाव तालुका बापू दत्तू शोधक (सोनेवाडी), संदीप दादा काळे (सुरेगाव), शिर्डी पोलीस ठाणे संकेत आप्पासाहेब गव्हाणे (कालिकानगर, शिडी), संतोष बापूराव शिंदे उर्फ शफ्या उर्फ संतोष शंकर शिंदे (कालिकानगर शिर्डी), राहता प्रशांत जनार्दन जाधव (रांजणगाव रोड, साईनगर), प्रवीण नानासाहेब वाघमारे (पिंपळस), गोकुळ कारभारी मासाळ
(रांजणगाव खुर्द), संगमनेर शहर शुभम बाळू गायकवाड (साठेनगर, घुलेवाडी), सद्दाम मन्सूर शेख (सय्यद् बाबा चौक, संगमनेर), संदीप संजय वाल्हेकर उर्फ जब्या (आठरापगड वेल्हाळे, संगमनेर), अमोल संजय जोंधळे (गुंजाळवाडी, संगमनेर), संगमनेर तालुका सुयोग अशोक दवंगे (हिवरगाव पावसा), सत्यम भाऊसाहेब थोरात (वडगाव पान), अकोला जनार्धन कमलाकर नवले (नवलेवाडी), घारगाव अण्णासाहेब सूर्यभान वाडगे (घारगाव), शुभम विश्वास उर्फ विश्वास गर्जे (रा. वडूले), आकाश उर्फ दत्तू उर्फ दत्ता उर्फ दत्तात्रय मच्छिंद्र सावंत, योगेश मच्छिंद्र सावंत, दिलीप दत्तात्रय शेलार व इतर एक, यासीन गणी शेख (सलाबतपूर) आदींविरुध्द तडीपारीचे प्रस्ताव श्रीरामपूर विभागाकडून जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात पाठविण्यात आले आहेत.

Kavya
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

हद्दपार
हद्दपार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

हद्दपार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!