महाशिवरात्री

नेवासा- तालुक्यातील हंडीनिमगाव येथील स्वयंभू त्रिवेणीश्वर देवस्थान प्रांगणात दि.११ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या महाशिवरात्री उत्सवाची देवस्थानचे महंत रमेशानंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी सुरू असून बुधवार ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता धर्म ध्वजारोहण सोहळा होत आहे. या सोहळयामध्ये महारुद्र स्वाहाःकार यज्ञ, आजानबाहू भक्त प्रल्हादगिरी महाराज मूर्ती प्राण प्रतिष्ठापना श्रीमद भागवत कथा व शिवलिलामृत पारायण सोहळा आदी धार्मिक कार्यक्रम होणार असून सोहळ्याचा शुभारंभ बुधवार दि.११ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता देवगड संस्थानचे उत्तराधिकारी महंत प्रकाशानंदगिरी महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे महंत देविदास महाराज म्हस्के, सदगुरू नारायणगिरी आश्रमाचे महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत धर्मध्वज पूजन व ध्वजारोहण होणार आहे. महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने सकाळी ५ ते ७ काकडा, ८ ते ११ शिवालिलामृत पारायण, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, ६ ते ७महाआरती, ७ ते ९ यावेळेत पंडित डॉ. काशिनाथजी मिश्रा यांच्या वाणीतून श्रीमद भागवत कथा नंतर महाप्रसाद असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत. ११ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या धर्मधर्मध्वजारोहन कार्यक्रमाला पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थान प्रमुख रमेशानंदगिरी महाराज, त्रिवेणीश्वर भक्त परिवार तसेच हंडीनिमगाव व सुरेशनगर ग्रामस्थांनी केले आहे.

महाशिवरात्री
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महाशिवरात्री
महाशिवरात्री

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महाशिवरात्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!