
नेवासा – तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी बहुजन दिव्यांग क्रांती सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष अमित जेधे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.९ फेब्रुवारी रोजी नेवासा नगरपंचायत चौकात उपोषण सुरू करण्यात आले आहे.

नगरपंचायत हद्दीतील दिव्यांगाचे शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमाकूल करून हक्काचे उतारे देण्यात यावे, दिव्यांगाना तत्काळ पंतप्रधान आवास योजनेचा लाभमिळावा, नगरपंचायत हद्दीतील दिव्यांगांना ५ टक्के निधीचा लाभमिळावा, दिव्यांगाची तत्काळ वारस नोंद लावण्यात यावी व उतारा मिळावा, नेवासे नगरपंचायत हद्दीतील दिव्यांगाला गाळे मिळावे, नगरपंचायत हद्दीतील दिव्यांगाची पाणीपट्टी, घरपट्टी माफ करावी, दिव्यांगांना युडीआयडी कार्डसाठी शिबिराचे नियोजन करण्यात यावे, नगरविकास विभागाकडून दिव्यांग कल्याण निधी उपलब्ध व्हावा, अशा मागण्या असल्याचे अमित जेधे यांनी सांगितले.

दिव्यांग क्रांती सेनेचे उपाध्यक्ष गणीभाई पठाण,सदस्य रहीम शेख, आरिफ पठाण, सुलेमान सय्यद, अर्जुन खरात, करीम पिंजारी, गुलाब शेख, अरुण भाकरे, अज्जूद्दीन शेख, पुंजाराम म्हैसमाळे, हालीमा पठाण, नजमा शेख, बाबासाहेब जाधव, अनिल कराडे, श्रीपाद जाधव, सुनंदा लोळगे, रुकसाना शेख, जब्बार पठाण, अशोक पाटोळे, विजय दाणे उपोषणात सहभागी झाले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

