नेवासाफाटा (वार्ताहर): त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या त्रिमूर्ती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, त्रिमूर्तीनगर येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विकास मंडळांतर्गत ‘निर्भय कन्या अभियान’ अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.अनुराधा गोरे होत्या. अध्यक्षीय भाषणात त्यांनी निर्भय कन्या अभियानाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थिनींनी शिक्षणासोबत आत्मसंरक्षण, आरोग्यजागरूकता आणि कायदेशीर हक्कांची माहिती ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. आत्मविश्वास, स्वयंशिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन यांमुळेच मुली जीवनात प्रगती करू शकतात असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून डॉ.स्नेहल आरसुळे यांनी विद्यार्थिनींना जीवनातील ध्येय निश्चित करून शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचे महत्त्व पटवून दिले. मोबाईलचा वापर मर्यादित ठेवून वेळेचे योग्य नियोजन करावे, स्वयंशिस्त अंगीकारावी आणि आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत असे त्यांनी सांगितले. सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि स्पष्ट उद्दिष्ट यांच्या जोरावर यशाचा मार्ग सुकर होतो असेही त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच स्त्रियांच्या सुरक्षिततेशी संबंधित कायदे व हक्कांविषयी त्यांनी विद्यार्थिनींना उपयुक्त माहिती दिली.

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात प्राचार्य डॉ.संध्या भंगाळे यांनी ‘मानसिक आरोग्य व्यवस्थापन व स्त्रियांचे स्वास्थ’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी मानसिक आरोग्याचे महत्त्व, तणाव नियंत्रणाच्या पद्धती, सकारात्मक दृष्टीकोन आणि स्वतःची काळजी घेण्याचे उपाय यांबाबत विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले. मानसिक आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास आणि जागरूकता आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थिनींनी वैयक्तिक सुरक्षा, आर्थिक नियोजन आणि मानसिक आरोग्याशी संबंधित प्रश्न विचारले. प्रा.नायडू यांनी कराटे प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाच्या मूलभूत तंत्रांची माहिती दिली.
यावेळी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.निकिता बर्गे, प्रा. अमृता देवकर, प्रा.योगिता गायकवाड, प्रा.अश्विनी औटी, प्रा.दिपाली भोसले, प्रा.नूतन वंजारे, प्रा.गायत्री ढाकिफळे, प्रा.गीता जाधव आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा डोईफोडे यांनी केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा.निकिता बर्गे यांनी करून दिला तर आभार प्रा.अश्विनी औटी यांनी मानले. कार्यशाळेला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

