घोडेगाव : नेवासा तालुक्यातील चांदा येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यामुळे विहिरीत पडलेल्या एका गायीचे प्राण वाचले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, चांदा गावातील हनुमान मंदिराच्या शेजारील एका आडात रात्रीच्या वेळेला एक गाय पडली होती. ही गाय बेवारस असल्यामुळे कुणीही त्याकडे लक्ष द्यायला तयार होईना. त्याच वेळेस गावातील बजरंग दलाच्या तसेच श्रीराम संघाच्या कार्यकर्त्यांना ही माहिती समजली. माहिती समजतात त्यांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेतली. ही घटना रात्री नऊ वाजता घडली असल्याने तेव्हा बजरंग दलाच्या व श्रीराम संघाच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ क्रेन बोलून युवकांनी विहिरीत उतरून त्या गायीला जीवदान दिले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

