गोळीबार


घोडेगाव— नेवासा तालुक्यातील अंमळनेर येथे जुन्या वादाच्या कारणातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या बाबत पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार काही दिवसांपूर्वी येथे दोन गटात रक्तरंजित थरार झाला होता. त्याच कारणातून दि. १० रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास गणेशवाडी येथील रोहित शिवाजी दरंदले (वय.२०) या युवकावर आरोपी सिताराम अशोक जाधव. रा. शिरेगाव याने आपल्या जवळील गावठी कट्यातुन गोळीबार करत जखमी केले. तर
व प्रकाश बाळु भोसले रा. निंभारी यास गुन्ह्याच्या अधिक तपासा कामी ताब्यात घेण्यात आले आहे.या गुन्ह्यातील मुख्य आरोपीच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना करण्यात आली आहे. तर जखमी दरंदले यास उपचारासाठी अहील्यानगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गोळीबार

कैलास ज्ञानदेव दरंदले(वय.४५)रा. गणेशवाडी यांनी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्या नुसार गुन्हा. रनं.४५/२०२६ बिएन एस चे कलम १०९(१), ३(५) आर्म अॅक्ट ३/२५, ७,२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे. घटनेची माहिती कळताच शेवगांव उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू , सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे व पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांनी घटना स्थळी भेट देऊन पहाणी केली व आरोपींच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना करण्यात आली आहे.

गोळीबार

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गोळीबार
गोळीबार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गोळीबार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!