टीईटी

नेवासा-राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेचा डंका वाजत असताना याच परीक्षेने एका कर्तव्यदक्ष शिक्षिकेचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथील श्रीगणेश इंटरनॅशनल स्कूलमध्ये ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या पूजा रोशन ठोंबरे यांचा पुणे येथील नाशिक फाटा येथे टँकरच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. या घटनेने सरकारच्या परीक्षा केंद्रांच्या अजब धोरणाविरोधात संताप उसळला आहे.

शनिवारी ८ फेब्रुवारी २०२६ रोजी शिक्षिका पूजा ठोंबरे (वय ३१) या सरकारने बंधनकारक केलेली टीईटी परीक्षा देण्यासाठी राहाता येथून बसने पुण्याला रवाना झाल्या होत्या. रात्री १० च्या सुमारास त्या नाशिक फाटा येथे उतरल्या. त्यांना घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक मोटारसायकल घेऊन आले होते. पूजा आणि त्यांची चिमुरडी मुलगी किमया मोटारसायकलवर बसून काही अंतर जात नाहीत, तोच एका भरधाव टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

टीईटी

या भीषण धडकेत दुचाकीस्वार आणि मुलगी किमया एका बाजूला फेकले गेले, मात्र दुर्दैवाने पूजा या टँकरच्या चाकाखाली आल्या. त्यांचा जागीच अंत झाला.एका क्षणात हसत-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं. पूजा ठोंबरे यांनी परीक्षेसाठी नगर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यासारखी जवळची केंद्रे ऑनलाईन अर्जात निवडली होती. मात्र शिक्षण विभागाने त्यांना तब्बल २०० किलोमीटर दूर असलेले पुणे केंद्र दिले. जर त्यांना जवळचे केंद्र मिळाले असते, तर आज पूजा जिवंत असत्या, अशी संतप्त भावना नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

शिक्षण विभागाच्या या ढिसाळ नियोजनाने आमच्या लेकीचा बळी घेतला आहे. महिला शिक्षिकांना घरापासून इतक्या लांब परीक्षा केंद्रे देऊन शासन नक्की काय साध्य करत आहे? असा जळजळीत सवाल आता उपस्थित होत आहे. मृत पूजा ठोंबरे या येवला एसटी डेपोचे असिस्टंट मॅनेजर रोशन ठोंबरे यांच्या पत्नी आणि राहाता तालुक्यातील वाकडी येथील ग्रामपंचायत सदस्य कैलास लहारे, बाळासाहेब लहारे, तुकाराम लहारे यांच्या भाची होत. त्यांच्या पश्चात पती आणि लहान मुलगी किमया असा परिवार आहे. परीक्षा घेताना शिक्षकांना, विशेषतः महिलांना, त्यांच्या जिल्ह्यांतर्गत किंवा जवळची केंद्रे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी होत आहे. पूजा ठोंबरे यांचा मृत्यू हा केवळ अपघात नसून तो व्यवस्थेचा बळी असल्याची भावना महिला शिक्षकांमध्ये आहे.

टीईटी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

टीईटी
टीईटी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

टीईटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!