नेवासा-अल्पवयीन मुलीला बळजबरीने फुस लावून कायदेशीर रखवालीतून पळवून नेवून तिला बळजबरीने लॉजवर नेवुन तीच्त्यावर तिच्या इच्छेविरुध्द पार्शवी अत्याचार करणा-या आरोपी ज्ञानेश्वर भास्कर तारडे वय ४० वर्षे राहणार सुरेगांव गंगा ता नेवासा जि अहिल्यानगर यास बालकांचे लैगिंक अपराधापासून संरक्षण अधिनियम व भारतीय दंड विधान संहिता अन्वये मा. विशेष न्यायाधीश श्री आर.आर हस्तेकर साहेब, नेवासा यांनी जन्मठेपची शिक्षा सुनावली. सदर खटल्यामध्ये सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील श्री देवा सयाजी काळे यांनी काम पाहीले.
घटनेची थोडक्यात हकीकत की, अल्पवयीन पिडीत मुलगी ही कॉलेजला शिक्षण घेत असतांना. घरुन स्कुटीवर येत जात असे. घटनेच्या दिवशी आरोपी ज्ञानेश्वर भास्कर तारडे यांची पिडीतेशी भेट झाली. त्यावेळ पिडीतेला कॉलेज ला जायचे होते. त्यावेळी आरोपी पिडीतेस म्हणाला की, मला हि तिकडेच माझे काम आहे. तेव्हा तुला तुझया कॉलेजवर सोडतो असे म्हणुन पिडीतेला मोटार सायकलवर बसवुन घेवुन गेला. कॉलेज आले नंतर पिडीतला आरोपीने कॉलेजवर न सोडता बळजबरीने जोरात त्यांची मोटार सायकल दुस-या गावी घेवुन गेला. त्यावेळी पिडीतेने आरोपीला कॉलेजवर सोडणेबाबत विनवणी केली असता आरोपीने पिडीतेचे काही एक ऐकले नाही व बळजबरीने मोटार सायकल नगर औरंगाबाद हायवे रोडच्या जवळ असलेल्या एका लॉजवर तीला बळजबरीने घेवुन गेला. तेव्हा पिडीतेने सुटण्याचा प्रयत्न केला असता आरोपी ज्ञानेश्वर भास्कर तारडे हा पिडीतेस म्हणाला की, माझे बिलाचे काम आहे काम संपल्यानंतर आपण जावु असे म्हणुन आरोपी यांने अल्पवयीन पिडीतेस बळजबरीने लॉजमध्ये नेवुन बळजबरीने पार्शवी अत्याचार केला. सायंकाळी कॉलेज संपण्याच्या सुमारास पिडीतेची आई पिडीतेस घेण्यासाठी तीच्या कॉलेज समोर स्कुटी घेवुन थांबली. बराच वेळ झाला फिर्यादीची मुलगी आली नाही. त्यावर काही वेळाने आरोपीने पिडीतेला त्यांच्या मोटार सायकल वरुन कॉलेज समोर कॉलेजच्या मागच्या गेट ने आणुन सोडले. त्यावेळी पिडीतेने तीचे आईस घडलेली सर्व हकिगत सांगितली.

कलम सदर घटनेबाबत पिडीतेचे आईने नेवासा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपी विरुध्द नेवासा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ८०१/२०२२ भारतीय दंड विधान संहिता ३६३,३६६(अ),३७६,३७६ (२),५०६,१०९,११४ तसेच पोक्सो कायदा ४,६,८,१२,१६,१७,१९,२१ तसेच अनुसुचित जाती जमाती कायदा कलम ३(१)( डबलु), ३ (२) (व्ही) (ए), ३ (२) (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. गुन्हाचा सखोल तपास पोसई मनोज मोंढे, सपोनि ज्ञानेश्वर थोरात, डी. वाय.एस.पी. संदिप मिटके यांनी करुन आरोपीस रुम उपलब्ध करून देणा-या लॉज चालक अक्षय यहुबा औताडे यास सहआरोपी करुन आवश्यक ती सर्व महत्वांची कागदोपत्री पुरावे प्राप्त करुन विहित मुदतीत दोषारोपपत्र मा. विशेष न्यायालयात दाखल केले.
सदर खटल्यात सरकारपक्षा तर्फे चौकशीकामी एकूण बारा साक्षीदार तपासण्यात आले. सदरचे विशेष खटल्यामध्ये पिडीत मुलगी, वैद्यकिय अधिकारी डॉक्टर बागवान, ग्रामीण रुग्णालय नेवासा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर कटारिया मॅडम सिव्हील हॉस्पीटल अहमदनगर, न्यायवैज्ञानिक संचालक कुडेकर नाशिक, कॉलेजचे प्राचार्य, शासकिय पंच, मुख्य कार्यकारी अधिकारी, नगर परिषद श्रीरामपुर, तपासी अधिकारी पोसई मनोज मोंढे, सपोनि ज्ञानेश्वर थोरात, डी. वाय. एस.पी. श्री संदिप मिटके यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. त्यामध्ये वैदयकिय अधिकारी यांनी पिडीतेची केलेली सखोल तपासणी, स्त्री रोग तज्ञ यांनी दिलेला पिडीतेचा वैदयकिय अहवाल, पिडीता व आरोपी यांचे प्राप्त केलेले डीएनए नमुने याबाबतचा वैदयकिय पुरावा महत्वपुर्ण ठरला, पिडीतेच्या नखामध्ये मिळालेले आरोपीचे त्वेचेचे नमुने, पिडीता आरोपी यांचे लैगिक अत्याचाराच्या दुष्टीने न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा नाशिक यांचेकडुन प्राप्त डीएनए अहवाल, लॉज रजिस्टर मधील आरोपीने केलेले लॉजप्रवेश नोदी व आरोपीच्या नैसर्गिक हस्ताक्षर याबाबत चा मा. हस्ताक्षर तज्ञ पुणे यांचा अहवाल, पिडीतेचे वयाचे प्रमाणपत्र, पिडीता घटनेच्या दिवशी कॉलेज मध्ये असलेली गैरहजर चे रजिस्टर, असे कागदोपत्री भक्कम पुरावे मा. न्यायालयासमोर सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकिल श्री देवा सयाजी काळे यांनी सुसंगतरित्या कायदेशीरपणे सिध्द केले. तसेच सरकारी वकिल यांनी केलेला चाणक्ष युक्तीवाद, तसेच न्यायालयात सादर केलेले मा. उच्च व मा. सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे ग्राहय धरून, मा. न्यायालयाने आरोपीला दोषी धरले. यामध्ये मा. न्यायालयाने असे निष्कर्श नोंदविले की, आरोपीची पिडीतेला वडिलधा-या पालकाप्रमाणे संभाळण्याची जबाबदारी असतांना आरोपीने पिडीत मुलगीच्या असहाय पणाचा व अज्ञानाचा फायदा घेवुन तीच्या वर बळजबरीने पार्षवी अत्याचार करुन तीचे आयुष्य कायमचे उध्दवस्त केले. आरोपी चे लग्न झालेले असुन आरोपीस पिडीतेच्या वयाऐवढी अपत्य आहेत. सदरचा गुन्हा हा माफ करण्यासारखा नसुन कठोरात कठोर शिक्षा करण्यासारखा आहे. त्यामुळे आरोपीला शिक्षे बाबत कुठल्याही प्रकारची सहानभुती दाखविता येणार नाही. असे मत मा. न्यायालयाने नोंदवुन आरोपीस जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे.

सदर आरोपी ज्ञानेश्वर भारकर तारडे वय ४० वर्षे राहणार सुरेगांवगंगा ता नेवासा जि अहिल्यानगर यास सदर गुन्हयात दोषी धरून, आरोपीला न्यायालयाने बालकांचे लैगिंक अत्याचारांपासून संरक्षण कायदा कलम ०४ अन्वये जन्मठेप, अजन्म सश्रम कारावास, भा. द. वि. कलम ३६३ अन्वये ७ वर्षे सश्रम कारावास, भा.द. वि. कलम ५०६ अन्वये १ वर्षे सश्रम कारावास व ६,००० द्रव्यदंडाची तसेच दंड नभरल्यास १ महिना साधी कैदेची शिक्षा सुनावली.
सदरच्या खटल्यात सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील देवा सयाजी काळे यांनी काम पाहिले, त्यांना पैरवी अधिकारी सहा. पोलीस उपनिरीक्षक नरेश चव्हाण, पो. कॉ/२४२५. भगवान वाघमोडे, मपो. कॉ./२२७ स्वाती तडुळकर यांनी सहकार्य केले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

