गोळीबार

घोडेगाव- नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे झालेल्या गोळीबारात एक ठार झाल्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. १२ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान नितीन शिरसाठ हे आपल्या फॅमिली सह येथील घोरपडे हाॅस्पीटल मध्ये पत्नीस उपचारासाठी घेऊन आले होते. अशातच चार अज्ञात व्यक्तींनी गावठी कट्यातुन शिरसाठ यांच्यावर बेछूट गोळीबार केला. त्यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी अहील्यानगर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी देखील आरोपींनी त्यांच्यावर फायर केले.

Kavya

त्यामध्ये त्यांचा जागेवर मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. घटनेची माहिती कळताच
एल सी बी टिम एपी आय भोये, हेड कॉन्स्टेबल बंड भागवत, पोलीस नाईक बाळु नागरगोजे,पोलीस काॅस्टेबल बाळासाहेब खेडकर, चालक उत्तरेश्वर मोराळे, सह कर्मचारी, शेवगाव पोलीस उप विभागीय निरज राजगुरू , नेवासा पोलीस ठाण्याचे एपी आय महेश पाटील,सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे , शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पहाणी केली. संशयित म्हणून दोन जणांना तपासा कामी ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

गोळीबार
गोळीबार

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गोळीबार
गोळीबार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गोळीबार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!