नेवासा- आज दैनिक लोकमत मध्ये २०:२०:०० रासायनिक खताच्या ग्रेडमध्ये 96% माती असल्याचे आढळले ही भयानक भेसळीयुक्त रासायनिक खताची बातमी वाचून मन सुन्न झाले. शेतकऱ्याची फार मोठ्या प्रमाणात लूट केली जाते. शेतकऱ्याच्या बियाणामध्ये भेसळ व त्यामुळे होत उगवण होत नाही तसेच रासायनिक खतामध्ये भेसळ केल्यामुळे पिकांची वाढ होत नाही, बुरशीनाशके व रोगनाशके फवारणी करून रोगाचे निर्मूलन होत नाही. कीटकनाशकांच्या फवारणीनंतर ही अनेक कीटक जिवंत असल्याचे शेतकरी सांगतात तसेच तणनाशकांचा वापर करूनही तणनाशके शेतामध्ये वाढतात. शेतकऱ्यांना फसवण्यासाठी अनेक मार्गाचा अवलंब केला जातो टॉनिक देण्याची फॅशन सुरू झाली आहे पिकांना टॉनिक देण्यासाठी नवीन रसायने बाजारात येत आहेत व त्याद्वारे शेतकऱ्यांशी फसवणूक केली जात आहे शेती व्यवसाय अनेक दृष्टीने संकटात आला आहे भेसळयुक्त निविष्ठा साठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी कारण की काळाची गरज आहे असे प्रतिपादन कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी व्यक्त केले


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

