लव्ह जिहाद

नेवासा-लव्ह जिहाद व फसवणूक अथवा बलपूर्वक करण्यात येणारे धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा करण्यात यावा शासन निर्णय दिनांक 14 फेब्रुवारी 2025 अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्याबाबत निवेदन नेवासा तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले त्यात म्हटले आहे की,
महाराष्ट्र शासन, गृह विभाग यांनी शासन निर्णय क्र. एनएएक्स 0724/प्र.क्र.240/ विशा-1ब, दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी “लव्ह जिहाद व फसवणूक करून किंवा बलपूर्वक करण्यात येणारे धर्मांतरण रोखण्याच्या अनुषंगाने कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी विशेष समिती गठीत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सदर समितीच्या माध्यमातून राज्यातील परिस्थितीचा अभ्यास करणे. प्राप्त तक्रारींचा आढावा घेणे, इतर राज्यांतील कायद्यांचा अभ्यास करणे व आवश्यक असल्यास कायद्याचा मसुदा तयार करणे अपेक्षित होते.

मात्र, सदर शासन निर्णयास एक वषपिक्षा अधिक कालावधी लोटूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही, अहवाल, शिफारस अथवा कायद्याच्या दृष्टीने पुढील निर्णय झाल्याचे निदर्शनास येत नाही. यामुळे राज्यातील अनेक भागात लव्ह जिहाद, फसवणूक करून केलेले विवाह, ओळख लपवून संबंध प्रस्थापित करणे, तसेच मानसिक दबाव, फसवणूक किंवा धमकीद्वारे धर्मांतरण केल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.

भारत देशातील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात. उत्तराखंड इत्यादी राज्यांनी या विषयावर कायदे केलेले असताना महाराष्ट्र राज्यात मात्र अद्याप ठोस कायदेशीर तरतूद नसल्याने पीडित महिलांना व कुटुंबांना न्याय मिळण्यात अडचणी येत आहेत.

Kavya

मार्च महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अधिवेशनात लव्ह जिहाद व बलपूर्वक/फसवणुकीद्वारे होणारे धर्मांतरण रोखण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात यावा, अशी राज्यातील सामान्य नागरिकांची ठाम व व्यापक मागणी आहे. तरी आपणास नम्र विनंती आहे की,वरील शासन निर्णय दिनांक 14 फेब्रुवारी 2025 च्या अंमलबजावणीबाबत शासन स्तरावर तातडीने पाठपुरावा करावा.विशेष समितीचा अहवाल व शिफारसी त्वरित पूर्ण करून त्या राज्य शासनास सादर करण्याबाबत कार्यवाही करावी.

येणाऱ्या अधिवेशनात लव्ह जिहाद व फसवणूक अथवा बलपूर्वक धर्मांतरण रोखण्यासाठी कठोर व प्रभावी कायदा करण्यात यावा. यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत शासनास सकारात्मक अभिप्राय पाठवावा.

लोकशाही व्यवस्थेत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, महिलांच्या सन्मानासाठी व सामाजिक सलोखा राखण्यासाठी सदर कायदा होणे अत्यंत आवश्यक आहे. अशी आमची ठाम भूमिका आहे.

आपण सदर निवेदनाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही कराल, अशी आम्हास अपेक्षा आहे.

चौकट- याबाबत काही होत नसल्याने या शासन निर्णयाची फोटो फ्रेम भिंतीवर स्मरण म्हणून लावण्यासाठी प्रशासनाला देण्यात आली.

लव्ह जिहाद
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

लव्ह जिहाद
लव्ह जिहाद

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

लव्ह जिहाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!