ग्रामपंचायत

नेवासे पोलीस ठाण्यात चौघा जनांविरुद्ध गुन्हा दाखल!

नेवासे (प्रतिनिधी) – सुरेशनगर (ता.नेवासे) येथील ग्रामपंचायत शिपाई असलेला सखाराम उर्फ अविनाश बाबासाहेब उभेदळ याने ‘तु माझ्या व सुरेशनगरच्या सरपंच शैला कल्याण उभेदळ यांच्या विरुध्द ग्रामपंचायतमधुन खालेल्या पैशा संदर्भात अहिल्यानगर जिल्हा परिषदेकडे केलेली तक्रार आता तु मागे घेतली नाही? तर तुला जीवे ठार मारुन टाकु? अशी धमकी देवुन सखाराम उर्फ अविनाश बाबासाहेब उभेदळ याने सामाजिक कार्यकर्ते अमृत सुरेश उभेदळ यांना लाथा बुक्याने मारहाण केल्याचा गुन्हा नेवासे पोलीस ठाण्यात दाखल झालेला असून या प्रकरणी नेवासा पोलिसांनी चोघा जणांवर गुन्हा नोंद दाखल केला आहे.

ग्रामपंचायत


याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की,अमृत उभेदळ यांनी नेवासे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,शुक्रवार (दि.13) रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास आमचे राहते घरासमोरील नारळाच्या झाडामध्ये नविन लावलेले काही नाराळाचे झाडाचे पाने आमचे शेजारी राहणारे विमलबाई बाबासाहेब उभेदळ रा.सुरेशनगर (ता. नेवासे) यांच्या शेळ्या ही पान खात असताना माझ्या घरासमोर रसवंती असलेले संदिप भास्कर कणगरे रा. सुरेशनगर यांने त्यांना समजावुन सांगितले असता तीने संदिप कणगरे यास शिवीगाळ केली त्यामुळे हा झालेला प्रकार संदिप याने अमृत उभेदळ यांना फोन करुन सांगितला असता ते घरी आले असता तो पर्यंत त्यांच्या घरासमोर ग्रामपंचायत शिपाईचे आई – वडील विमलबाई बाबासाहेब उभेदळ व तीचा मुलगा ग्रामपंचायत शिपाई सखाराम उर्फ अविनाश बाबासाहेब उभेदळ, पती बाबासाहेब कोंडीराम उभेदळ आणि सुन सारिका सखाराम उर्फ अविनाश उभेदळ असे आलेले होते.
त्यांना आमचे घरासमोर शेळ्या जावु देवु नका व संदिप कणगरे यांना शिवीगाळ करु नका असे अमृत उभेदळ यांनी समजावुन सांगितले असता, त्यावर अविनाश उभेदळ तसेच माझे घरच्यांना वरील चौघांनी अर्वाच्च वाईट शिवीगाळ केली व सखाराम उर्फ अविनाश बाबासाहेब उभेदळ याने अमृत उभेदळ यांना ‘तु माझे व सरपंच शैला कल्याण उभेदळ’ अशा आमच्या विरुध्द ग्रामपंचायतमधुन खालेल्या पैशा संदर्भात नगर जिल्हा परीषद येथे केलेली तक्रार मागे घेतली नाही तर तुला ठार मारुन टाकु,अशी धमकी देवुन सखाराम उर्फ अविनाश बाबासाहेब उभेदळ याने अमृत उभेदळ यांना लाथा बुक्याने मारहाण केली त्यामुळे अमृत उभेदळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासे पोलीस ठाण्यात चौघा जनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास नेवासे पोलीस करत आहेत.

ग्रामपंचायत
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

ग्रामपंचायत
ग्रामपंचायत

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

ग्रामपंचायत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!