नेवासा -तालुक्यातील कौठा येथील लवांडे वस्तीवर गुरुवारी मध्यरात्री चोरीची घटना घडली आहे. हिवरा रोडवर मुळा उजव्या कालव्यालगत राहत असलेल्या गणेश सुदाम लवांडे यांच्या घरी शुक्रवारी रात्री १ ते २ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराची खिडकी तोडून आत प्रवेश केला. गणेश लवांडे हे पलंगावर झोपलेले असताना त्यांना त्याच अवस्थेत चोरट्यांनी बांधून ठेवत घरातील सामानांची उचकापाचक करत ५० हजार रुपये रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी करत पोबारा केला. यापूर्वी देखील तीन वेळा याच वस्तीवर चोरीची घटना घडली होती.
त्याचाच तपास प्रलंबित असताना परत एकदा चोरीची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या चोरीच्या घटनेत अज्ञात चोरट्यांनी एकूण १ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची माहिती पोलिसांनी दिली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

