नेवासा -तालुक्यातील कुकाणा दुरक्षेत्रात नेवासा फाटा ते शेवगाव रोडवर एका मालवाहतूक गाडीतील इसमाकडून
गावठी बनावटीचे पिस्तुल हस्तगत केले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक १४/०२/२०२६ रोजी पोहवा शहाजी आंधळे यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, कुकाणा गावात नेवासा फाटा ते शेवगाव जाणारे रोडवर कुकाणा दुरक्षेत्रा समोर एक सुझुकी कंपनीच्या गाडी क्र एम.एच. १६ सी.डी. ४४०५ मधील एका इसमाकडे एक देशी बनावटीचे पिस्तुल आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने पोहवा शहाजी आंधळे यांनी लागलीच मिळालेली माहीती वरिष्टांना कळवुन कुकाणा दुरक्षेत्र येथे दोन पंचांना बोलावुन कुकाणा दुरक्षेत्र येथील पोशी अमोल डमाळे, होम बाळु सावंत, होम प्रशांत चव्हाण, होम चंद्रकांत घाडगे, होम श्रीधर लिपणे, अशांना बोलावुन मिळालेल्या माहीती थोडक्यात सांगुन माहीतीची खात्री करण्यासाठी कुकाणा येथील तरवडी चौक येथे सापळा रचुन थांबले मिळालेल्या माहीती प्रमाणे एक मालवाहु वाहण क. एम.एच. १६ सी.डी. ४४०५ असे तरवडी चौकात आले असता त्यास थांबवुन पंचासमक्ष त्यातील चालकाला त्यास त्याचे अंगझडती घेण्याचा कायदेशीर उददेश सांगुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव १. संतोष कारभारी नरोटे वय. २२ वर्ष रा. मोहरी ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर असे सांगुन त्याची अंगझडती घेतली असतात्याचे कमरेला एक देशी बनावटीचे पिस्तुल मॅगझीनसह मिळून आले पंचासमक्ष मॅगझीन खोलुन पाहिले असता त्यामध्ये तिन जिवंत काडतुस मिळून आल्याने आरोपीस पिस्तुल चे परवाना बाबत विचारपुस केली असता त्याने काहीएक समाधानकारक उत्तर दिले नाही. आरोपीने सदरचे गावठी बनावटीचे पिस्तुल बेकायदेशीर पणे स्वतःचे कब्जात बाळगल्याची खात्री झाल्याने नमुद आरोपीचे ताब्यातुन जप्त करण्यात आलेल्या मुददेमालाचे वर्णन :-

१,५०,०००/-रु कि.चा एक स्टील सारखे धातुचा त्यास बाउन रंगाची ग्रीप असलेला गावठी पिस्टल त्यास बॅरेल, मॅक्झीन, ग्रीप, ट्रिगर असलेला गावठी बनावटीचा। पिस्टल जु.वा.कि.अं
२.९००/-रु कि.चे तिन जिवंत काडतुस जु.वा.कि.अं
३.४,००,०००/-रु कि.चे एक सुझुकी कंपनीची सुपर कॅरी सी. एन. जी मॉडेल ची मालवाहतुक गाडी क्र
एम.एच. सीडी ४४०५ आशी जे.डब्ल्यू.के.ए.
एकुण ४,५०,९००/-रु
किमतीचा मुददेमालदोन पंचासमक्ष जप्त करुन आरोपी नामे. संतोष कारभारी नरोटे वय, २२ वर्ष रा. मोहरी ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर याचे विरोधात पोशी अमोल डमाळे यांनी नेवासा पोलीस स्टेशन येथे गु. रंनं १११/२०२६ शस्त्र अधिनीयम कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक सो श्री सोमनाथ घार्गे अहिल्यानगर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर श्री सोमनाथ वाकचौरे, मा. अप्पर पोलीस अधिक्षक अहिल्यानगर श्री वैभव कलुबर्मे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो शेवगाव श्री निरज राजगुरु यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. महेश पाटील, सपोनि अमोल पवार, पोसई अहिरे, पोहवा शहाजी आंधळे, पोशी अमोल डमाळे, पोशी संदीप ढाकणे, होम बाळु सावंत, होम प्रशांत चव्हाण, होम चंद्रकांत घाडगे, होम श्रीधर लिपणे, यांनी केली असुन नमुद गुन्हयातील आरोपी अटक करण्यात आला आहे. असुन पुढील तपास सपोनि अमोल पवार हे करीत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

