त्रिवेणीश्वर
त्रिवेणीश्वर

नेवासा फाटा – नेवासा तालुक्यातील स्वयंभू त्रिवेणीश्वर महादेव येथे महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने कथा प्रवक्ते डॉ. काशिनाथ मिश्रा यांच्या सुश्राव्य वाणीतून आयोजित भागवत कथा सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बुधवारीपासून सायंकाळी ७ ते ९ यावेळेत होत असलेल्या भागवत कथा सोहळ्यासाठी अनेक संत महंत उपस्थित राहत आहेत. कथा सोहळ्यासाठी आलेल्या सर्व संत महंतांचे त्रिवेणीश्वर महादेव संस्थानचे प्रमुख महंत स्वामी रमेशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते
संतपूजन केले जात आहे.

त्रिवेणीश्वर

या कथा सोहळ्यात पंडित डॉ. काशीनाथ मिश्रा महाराज हे उपस्थित भाविकांना कथा सांगत आहेत. या कथा सोहळ्याच्या निमित्ताने त्रिवेणीश्वर महादेव मंदिर, मंदिर प्रांगणातील अजानबाहू भक्त प्रल्हादगिरीजी महाराज समाधी मंदिर, अन्नपूर्णा माता मंदिर, बजरंग बली व शनिदेव मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई तसेच प्रवेशद्वारासमोरील गणेश मूर्तीजवळ उभारण्यात आलेले कारंजे हे भाविकांचे खास आकर्षण ठरले आहे. शनिवारी (दि.१४) कथा सोहळ्याची सांगता होणार असल्याने या प्रसंगी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

त्रिवेणीश्वर
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

त्रिवेणीश्वर
त्रिवेणीश्वर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

त्रिवेणीश्वर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!