सोनई फार्मसी
सोनई फार्मसी

सोनई – येथील मुळा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील चतुर्थ वर्ष बी फार्मसी अभ्यासक्रमाच्या चार विद्यार्थ्यांची मॅकलॉइड फार्मा. लि. सारीगम या औषधनिर्मिती क्षेत्रातील नामांकित कंपनीत नोकरीसाठी नुकतीच निवड झाली आहे. यामध्ये महाविद्यालयाच्या तुषार गागरे, सुयोग उनवणे, ओंकार लोहकरे व वैभव सोनवणे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

सोनई फार्मसी

नाशिक येथे या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. सोनई फार्मसी महाविद्यालयात स्वतंत्र ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग कार्यरत असून त्याद्वारे विविध औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्यू आयोजित करून नोकरी मिळण्याकरता विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मुळा एज्युकेशनचे संस्थापक मा.खा. यशवंतरावजी गडाख, मा.आ.शंकरराव गडाख, संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख, सचिव उत्तमराव लोंढे, प्राचार्य डॉ. विनायक देशमुख, उपप्राचार्य डॉ. विलास घावटे, प्रा. अमोल घुले यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

सोनई फार्मसी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सोनई फार्मसी
सोनई फार्मसी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सोनई फार्मसी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!