आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
दूध

इलेक्ट्रॉनिक काट्यांच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह; रिमोटद्वारे वजनात फेरफार होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

सोनई : नेवासा तालुक्यात दूध उत्पादन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असताना दूध संकलन केंद्रांवरील कथित अनियमिततेमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. दूध मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक काट्यांच्या अचूकतेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, काही ठिकाणी काट्यांमध्ये कथितरीत्या फेरफार करून शेतकऱ्यांच्या दुधाच्या वजनात तफावत केली जात असल्याचा आरोप दूध उत्पादकांकडून करण्यात येत आहे.दूध उत्पादक शेतकरी पहाटेपासून जनावरांची देखभाल करून दूध काढतात.

दूध

मात्र, संकलन केंद्रावर दूध दिल्यानंतर त्याचे अचूक वजन आणि योग्य गुणवत्ता नोंदवली जाते की नाही, याबाबत शेतकऱ्यांना शंका निर्माण झाली आहे. विशेषतः इलेक्ट्रॉनिक काट्यांमध्ये रिमोटच्या माध्यमातून फेरफार करता येतो, असा दावा काही दूध उत्पादकांकडून करण्यात येत आहे. या आरोपांची अधिकृत चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे. काटे असूनही अचूक वजनाची खात्री कोण देणार?अनेक दूध संकलन केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक वजनकाटे वापरले जात असले तरी त्यांची नियमित तपासणी, पडताळणी आणि सीलिंग केली जाते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दूध

काट्यांची तपासणी वेळोवेळी न झाल्यास वजनामध्ये किरकोळ तफावत झाली तरी त्याचा थेट आर्थिक फटका दररोज दूध देणाऱ्या शेतकऱ्यांना बसू शकतो.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एका दिवसातील तफावत किरकोळ वाटली तरी महिन्याभरात आणि वर्षभरात त्याचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे दूध संकलन केंद्रांवरील वजनकाट्यांची अचानक तपासणी करून त्यांची अचूकता प्रमाणित करण्याची मागणी जोर धरत आहे.
क्वालिटी मशीनच्या रीडिंगवरही संशय दूधाच्या वजनाबरोबरच त्यातील फॅट व इतर गुणवत्तेच्या घटकांवर दूधाचा दर निश्चित होत असतो. त्यामुळे दूधाची गुणवत्ता तपासणाऱ्या मशीनचे रीडिंग शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, या मशीनच्या रीडिंगमध्ये मनमानी केली जात असल्याचा आरोप काही दूध उत्पादकांनी केला आहे.

दूध


क्वालिटी तपासणीच्या मशीनमध्ये फेरफार करून प्रत्यक्ष गुणवत्तेपेक्षा कमी रीडिंग दाखवले जाते का, याचीही तपासणी करण्याची मागणी होत आहे. कारण फॅट किंवा इतर गुणवत्तेच्या मापदंडात अल्प फरक पडला तरी त्याचा परिणाम शेतकऱ्याला मिळणाऱ्या दूध दरावर होतो.दूध उत्पादकांच्या हक्काचा प्रश्न दूध संकलन केंद्रावर वजन आणि गुणवत्ता तपासणी ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याला त्याच्या दूधाचे वजन, फॅट रीडिंग, दर आणि मिळणारी रक्कम याची स्पष्ट माहिती मिळणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक संकलन केंद्रावर प्रमाणित वजनकाटा, तपासणीची नोंद आणि गुणवत्तेच्या मशीनची नियमित कॅलिब्रेशन प्रक्रिया असावी, अशी मागणी दूध उत्पादकांकडून होत आहे.

दूध

प्रशासनाने धडक तपासणी करावी नेवासा तालुक्यातील दूध संकलन केंद्रांवर अचानक पथक पाठवून इलेक्ट्रॉनिक वजनकाटे आणि दूध गुणवत्ता तपासणी यंत्रांची तपासणी करावी. वजनकाट्यांची अधिकृत प्रमाणित तपासणी करून त्यावर सील आणि प्रमाणपत्र आहे का, याची पडताळणी करावी. तसेच दूधाच्या फॅट व गुणवत्तेच्या रीडिंगमध्ये कोणत्याही प्रकारे फेरफार होत नाही ना, याची तांत्रिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी दूध उत्पादकांनी केली आहे.जिल्हाधिकारी, नेवासा तहसीलदार तसेच संबंधित वैधमापनशास्त्र विभाग आणि इतर सक्षम यंत्रणांनी या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन तालुक्यातील दूध संकलन केंद्रांची तपासणी करावी. दोष आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.
शेतकऱ्यांच्या घामाच्या कमाईत वजन आणि गुणवत्तेच्या नावाखाली तफावत होत असेल, तर ही बाब केवळ दूध उत्पादकांच्या आर्थिक नुकसानीची नसून संपूर्ण दूध संकलन व्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासनाच्या तपासणीकडे आता दूध उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

दूध

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दूध
दूध
दूध

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दूध

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!