बेलापूर-परळी या रेल्वे मार्गाबाबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत बैठक घेऊन विषय मांडू
नेवासा-बेलापूर – परळी या रेल्वे मार्गाबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या बरोबर बैठक घेऊन विषय मांडू, असे आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी कुकाणे येथे बेलापूर -परळी या रेल्वेमार्गासाठी उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांना दूरध्वनीवरुन दिले.
कुकाणे येथे ९ फेब्रुवारी पासून रेल्वे कृती समितीच्या सुरु असलेल्या उपोषणाचा मंगळवारी हा उपोषणाला नववा दिक्स होता. मंगळवारी आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या मध्यस्थीने पालकमंत्री विखे यांनी दूरध्वनीवरून उपोषणकर्ते यांच्याशी संवाद साधला. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी या उपोषणस्थळी आमदार लघे यांनी भेट दिली होती. त्यांनी या रेल्वे समितीच्या पदाधिकाऱ्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली होती. तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी या विषयावर गंभीयनि चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन आमदार लंघे यांनी दिले होते.

आमदार लंघे यांनी मुबंई येथे पालकमंत्री विखे यांची भेट घेवून तसेच उपोषणकर्ते यांच्याशी पालकमंत्री विखे यांचेशी मध्यस्थी करत दूरध्वनी वरून संवाद करून दिला, पालकमंत्री
विखे यांनी उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली तसेच लवकरच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या बरोबर या रेल्वे मार्गाबाबत बैठक घेऊन विषय मांडण्याचे आश्वासन मंत्री विखे यांनी उपोषणकर्त्यांना देवून उपोषण सोडण्यासाठी पालकमंत्री यांनी विनंती केली. १०४ वर्षापासून प्रलंबित असलेल्या बेलापूर परळी रेल्वे मार्गासाठी आमदार विठ्ठलराव लंघे – यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या रेल्वे मार्गाचे मंजुरी मिळवण्यासाठी कितपत यशस्वी होतात? याकडे यामार्गावरील जनतेचे लक्ष लागून आहे.
मंजुरीचे पत्र मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही
उपोषणकर्त्यांनी मंजुरीचे पत्र मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, असे सांगितले. हे उपोषण दहाव्या दिवशीही सुरूच राहणार आहे. उपोषणकर्त्यांना शारीरिक त्रास जाणवू लागला आहे. आंदोलकांची तब्येत बिघडणार की, उपोषण सोडवण्यासाठी यशस्वी माध्यस्थी घडवून आणणार याकडे आता गावाकऱ्याच्या नजरा लागून आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

