उपोषण

जिल्हा रुग्णालयातही उपोषण सुरूच ठेवणार : रितेश भंडारी

नेवासा-बेलापूर परळी रेल्वेमार्गाला केंद्र सरकारकडून मंजुरीचा ‘ग्रीन सिग्नल ‘ मिळण्यासाठी कुकाणा (ता. नेवासे) येथे रेल्वे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला बुधवारी दहावा दिवस सुरू आहे. या उपोषणकर्त्यांना उपोषणस्थळी कमालीचा अशक्तणा आणि चकर येत आहे. या उपोषण्णार्थीची पुढील वैद्यकीय तपासणी करण्यासाठी नेवासे तालुका प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. दीपक डिंबर यांनी नेवासे पोलिसांना पत्र आणि माहिती देऊन या उपोषणार्थीना
जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलेले असल्याची माहिती डॉ. डिंबर यांनी दिली.

उपोषण

बेलापूर परळी रेल्वेमार्ग मंजुरीसाठी रेल्वे कृती समितीच्यावतीने रितेश भंडारी, रज्जाक इनामदार व सुरेश नरवणे यांनी सोमवार दि.९ पासून कुकाणा येथे ग्रामपंचायत स्टेजवर आमरण उपोषण सुरू केलेले आहे. बुधवारी उपोषणार्थीचा १० वा दिवस होता. मात्र, या उपोषणकत्यांनी अशक्तणा व चवर येत असल्याचे वैद्यकीय विभागाला कळविल्याने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिपक डिंबर, डॉ. कैलास कानडे आरोग्य पथकाने उपोषणस्थळी जाऊन या उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी केली. पुढील वैद्यकीय तपासणीसाठी या उपोषणकर्त्यांना नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती डॉ. डिंबर यांनी दिली. अशक्तणा व चक्कर येत असल्यामुळे आरोग्य तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आम्ही जात असलो तरी आमचे उपोषण जिल्हा रुग्णालयात सुरुच राहणार असल्याची माहिती उपोषणकर्ते रितेश भंडारी यांनी दिली.

उपोषण
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

उपोषण
उपोषण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

उपोषण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!