देवगड फाटा (वार्ताहर):पवित्र रमजान महिन्याची सुरुवात लवकरच होणार असून यंदा चंद्रदर्शनानुसार १९ फेब्रुवारी २०२६ पासून रोजा (उपवास) सुरू होणार आहे . या पार्श्वभूमीवर नेवासा तालुक्यातील मुस्लिम समाजातील नागरिकांकडून पहाटेच्या वेळेत वीजपुरवठा खंडित (गॅप) न ठेवता अखंडित वीज द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रमजान महिन्यात दररोज पहाटे ‘सहेर’साठी नागरिक लवकर उठतात. स्वयंपाक, पाणी भरणे, घरातील आवश्यक कामे तसेच मशिदींमध्ये फजर नमाजासाठी तयारी तसेच कुराण पठण ,या सर्वांसाठी विजेची गरज असते. मात्र अनेक भागांत पहाटेच्या वेळेत नियमित वीज ‘गॅप’ ठेवला जातो. या काळात वीज नसल्यामुळे महिलांना अंधारात स्वयंपाक करावा लागतो, पिण्याच्या पाण्याच्या मोटारी बंद राहतात तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अडचणींना सामोरे जावे लागते, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

नेवासा तालुक्यातील विविध गावांतील मुस्लिम बांधव लवकरच संबंधित वीज वितरण विभागाशी संपर्क साधून त्यांची भेट घेणार असल्याचे माहिती जळके बुद्रुक चे तंटामुक्ती अध्यक्ष पत्रकार इकबाल शेख यांनी दिली .
रमजान हा संयम, प्रार्थना आणि आत्मशुद्धीचा महिना असून या काळात प्रशासनाने सहकार्याची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.पहाटे किमान सहेर व फजर नमाजपर्यंत अखंडित वीजपुरवठा ठेवावा, अशी मागणी करण्यात येत आहे
त्यामुळे सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती करण्यात येत आहे. दरम्यान, संबंधित वीज वितरण विभागाकडून याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

