घोडेगाव— नेवासा तालुक्यातील पानेगाव येथे पती कडून पत्नीस मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या बाबत सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार पायल राहुल जंगले (वय.२७) रा. पानेगाव ही आपल्या घरात स्वयपांक करत असताना थोडावेळ मुलाला सांभाळा मि तुमच्या साठी स्वयंपाक करत आहे. असे आरोपी पती राहुल बाळासाहेब जंगले यास म्हणाले असता त्याचा राग येऊन मला शिवीगाळ करत काठीने मारहाण करत जखमी केले. तुझी भांडी घेऊन निघून जा.नाहीतर तुला जिवे मारीन अशी धमकी दिली असल्याचे दि. २० रोजी सोनई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे. त्या नुसार ६४/२०२६ बिएन एस चे कलम ११८(१), ११५(२), ३५२,३५१(२) (३) प्रमाणे संबंधित पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अंकुश दहीफळे हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

