
नेवासा – नेवासा एस टी आगारामध्ये विना अपघात कार्य करणारे चालक बाबासाहेब भिसे व चालक ज्ञानदेव आगळे हे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.सेवा निवृत्तीबद्दल त्यांचा नेवासा आगारात एस.टी कर्मचाऱ्यांचा सेवानिवृतीबद्दल मध्यमेश्वर देवस्थानचे महंत श्री ऋषिनाथजी महाराज व मुकाई आश्रमाचे प्रमुख बालब्रम्हचारी महंत श्री गोपालानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी मध्यमेश्वर देवस्थानचे महंत श्री ऋषिनाथजी महाराज व मुकाई आश्रमाचे प्रमुख बालब्रम्हचारी महंत श्री गोपालानंद गिरीजी महाराज,माजी जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम सर्जे,प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल ताके पाटील, वाहतूक नियंत्रक काकासाहेब पोटे,प्रवासी संघटनेचे सचिव पत्रकार सुधीर चव्हाण,पत्रकार शाम मापारी, ग्रामविकास अधिकारी विलास काकडे,कामगार नेते अनिल टाके, भगवानराव आगळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेवासा डेपोचे स्थानक प्रमुख ज्ञानेश्वर मुरदारे हे होते.

यावेळी कामगार नेते रमेश दाणे यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.सेवानिवृत्त चालक ज्ञानदेव आगळे हे २१ वर्षे व चालक बाबासाहेब भिसे हे ३१ वर्षे विना अपघात सेवेद्वारे सेवानिवृत्त होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महंत ऋषिनाथ महाराज व गोपालानंदगिरी महाराज यांच्या हस्ते चालक आगळे व भिसे यांचा सन्मान करण्यात आला. पुढील कार्यासाठी शुभाशीर्वाद ही दिले.

यावेळी चालक वाहक तांत्रिक कामगार बांधवांच्या वतीने चालक ज्ञानदेव आगळे व बाबासाहेब भिसे यांचा गौरव पाचीपोशाख व बुके देऊन करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डेपोचे आस्थापना विभाग प्रमुख वासुदेव आव्हाड यांनी केले उपस्थित कामगार व प्रवाशी बांधवांना भोजन देण्यात आले.अनिल जरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

