आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
शिवजयंती

नेवासा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त पोलीस स्टेशन नेवासा येथील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेशजी पाटील यांनी एक अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम राबवला.

महान साहित्यिक रणजित देसाई लिखित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चरित्रग्रंथ ‘श्रीमान योगी’ नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवकांना भेट देत शिवजयंती वेगळ्या आणि अर्थपूर्ण पद्धतीने साजरी करण्यात आली.

यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक पाटील यांनी रामराज्यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यकारभार हा भारतवर्षातील सुशासनाचा आदर्श काळ होता, असे प्रतिपादन केले. रयतेच्या हितासाठी पारदर्शक, न्यायनिष्ठ आणि लोकाभिमुख प्रशासन देणाऱ्या शिवरायांच्या कार्यामुळे प्रजेच्या मनात राज्याविषयी अपार आपुलकी निर्माण झाली होती, असेही त्यांनी नमूद केले.

शिवाजी महाराजांच्या सुशासनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नगरसेवकांनी लोकहिताला प्राधान्य देत नेवासा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करावे आणि शिवरायांचा वारसा कृतीतून जपावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

शिवजयंती

पोलिसातील उपक्रमशील व चांगल्या उपक्रमांना पाठिंबा देत वैचारिक उंची देणाऱ्या पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचा आज नगरसेवकांना शिवचरित्र देण्याचा उपक्रम हा त्यांच्यातील सामाजिक भान असलेला अधिकारी असल्याचे दर्शवतो असे सांगत नगराध्यक्ष डॉक्टर करण सिंह घुले यांनी महेश पाटील यांच्या उपक्रमाचे कौतुक केले

या प्रसंगी नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. या अनोख्या उपक्रमामुळे शिवजयंती उत्सवाला वैचारिक आणि प्रेरणादायी परिमाण लाभले.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिवजयंती
शिवजयंती
शिवजयंती

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिवजयंती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!