नेवासा : प्रभू रामचंद्रांच्या अयोध्या नगरीत पालघर जिल्हयातील तुंगारेश्वर पर्वत येथील परशुराम कुंड देवस्थानचे महंत बालयोगी सदानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाला श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत राष्ट्रसंत भास्करगिरी बाबांनी भेट दिली.

संत श्री ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षानिमित्त अयोध्या नगरीत बालयोगी सदानंद महाराज ज्ञानेश्वरी पारायण महोत्सव समिती व अखिल वारकरी समाज महाराष्ट्र यांच्या वतीने ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण निमित्त पैठण येथील शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज यांचे १४ वे वंशज योगीराज महाराज गोसावी यांचे दुपारी ३ ते ५ यावेळेत भावार्थ रामायण कथा तर श्रीराम जन्मभूमी मंदिराचे कोषाध्यक्ष आचार्य स्वामी गोविंदगिरी महाराज यांची दुपारी सायंकाळी ५.३० ते ६.३० यावेळेत छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कथा सुरू असून या सोहळ्याला गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या समवेत देवगड भक्त परिवारातील सेवेकऱ्यांनी भेट दिली.

यावेळी सोहळा समितीचे मार्गदर्शक बालयोगी सदानंद महाराज व श्रीराम जन्मभूमी मंदिराचे कोषाध्यक्ष आचार्य स्वामी श्री गोविंदगिरी महाराज, सचिव चंपतराय उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

