नगरसेवक

नेवासा – नगरपंचायतीचा सन 2026-27 चा वार्षिक अर्थसंकल्प चार कोटी सत्तर लाख रुपयांच्या शिलकीसह सादर करण्यात आला. विशेष म्हणजे यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. महिला व बालकल्याण, दिव्यांग तसेच आर्थिक दुर्बल घटकांसाठी पाच टक्के निधी राखून ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यावर्षी सुमारे 52 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यानुसार उत्पन्नाचा अंदाज मांडण्यात आला आहे.

अर्थसंकल्प

नगराध्यक्ष करण सिंह घुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीस उपाध्यक्ष शालिनीताई सुदान, गटनेते जितेंद्र कुरे, उपाध्यक्ष सागर झावरे, मुख्याधिकारी निखिल फराटे व लिपिक योगेश गवळी यांच्यासह सर्वपक्षीय सदस्य उपस्थित होते.

अर्थसंकल्प

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्याधिकारी निखिल फराटे यांनी सांगितले की, भांडवली उत्पन्नातून पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे 120 कोटी रुपये जमा होण्याची शक्यता आहे. नव्या सर्वेक्षणानुसार नेवासा शहरातील महसुली जागांमध्ये सुमारे चार हजारांची वाढ झाली आहे. नवीन पाणी योजनेच्या पार्श्वभूमीवर बोगस कनेक्शन अधिकृत करण्यासाठी प्रोत्साहन योजना राबविण्यात येत असून बंद व्यापारी गाळे व फिरते गाडे यांच्याकडून मिळणाऱ्या उत्पन्नातून सुमारे साडेतीन कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

अर्थसंकल्प

खर्चाच्या बाजूला घनकचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठा दुरुस्ती हे दोन प्रमुख प्रश्न प्राधान्याने हाताळले जाणार आहेत. नगरपंचायत नव्या मोठ्या अग्निशामक गाडीची खरेदी करणार असून आपत्कालीन परिस्थितीत त्याचा मोठा फायदा होणार आहे. याशिवाय सार्वजनिक शौचालये, मुतारी व बगीचा उभारणीसारखे उपक्रम हाती घेण्याचा मानसही व्यक्त करण्यात आला.

अर्थसंकल्प

नवीन पाणी योजनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील बोगस व अनधिकृत नळजोड अधिकृत करण्यासाठी 31 मार्चपर्यंत विशेष प्रोत्साहन योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अर्धा इंची नळासाठी 6,100 रुपये तर पावण इंची नळासाठी 6,700 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. या मुदतीनंतर अनधिकृत नळजोड आढळल्यास संबंधितांचे कनेक्शन बंद करून नगरपंचायत अधिनियमांतर्गत दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अर्थसंकल्प
अर्थसंकल्प

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अर्थसंकल्प

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!