नेवासा – नेवासा बुद्रुक शिवारात प्रवरा नदीच्या तीरावर असलेल्या श्रीराम अगस्ती आश्रमाच्या ९ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने येथे सुरू असलेल्या त्रिदिनात्मक सोहळयाला त्र्यंबकेश्वर येथील श्री श्री १००८ महामंडलेश्वर महंत स्वामी शिवगिरीजी महाराज यांनी भेट दिली.यावेळी झालेल्या प्रवचन सोहळयाला भाविकांनी मोठी गर्दी केली होती.मनुष्य जीवाला नवी दिशा मिळण्यासाठी संतांच्या चरणी नतमस्तक व्हा,सदगुरूंचे चरण धरा जीवाला नवीन मार्ग प्राप्त होईल,संतच देवाकडे नेण्याचे काम करतात कलयुगात भगवंतांचे नामस्मरण हेच एकमेव साधन असल्याचे प्रतिपादन महंत शिवगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलताना केले.

श्रीराम अगस्ती आश्रमाचे प्रमुख महंत श्री ज्ञानगिरीजी महाराज,महंत श्री गंगागिरीजी महाराज,पैठण येथील महंत शंकरगिरीजी महाराज,हभप भानुदास महाराज भिसे बाबा,हभप दत्ता महाराज वैद्य,महंत बालागिरीजी महाराज,महंत गणेशानंद महाराज,प्रकाशगिरी बाबाजी, ओंकार महाराज बाबाजी व्यासपीठावर उपस्थित होते. गुरुवर्य महामंडलेश्वर महंत श्री शिवगिरीजी महाराज यांच्यासह उपस्थित संत महंतांचे संतपूजन सोहळा संयोजक महंत ज्ञानगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलतांना महामंडलेश्वर महंत स्वामी शिवगिरीजी महाराज म्हणाले की हरिला जीवनात प्राप्त करायचे असेल तर संताविना प्राप्ती नाही,भवाचे बंधन तोडायचे असेल तर संताकडे जाणे हाच पर्याय आहे कारण संत तेथेच भगवंत आपोआपच येतात,देवाला ठेऊन घेण्याची ताकद संतामध्येच असल्याचे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
श्रीराम अगस्ती आश्रमाला अगस्ती ऋषी सारख्या महान संताचा पदस्पर्श झालेला असल्याने हा परिसर तीर्थक्षेत्र बनले आहे.१०८ महंत श्री ज्ञानगिरीजी बाबांनी येथील परिसरात नंदनवन फुलवले आहे,भक्त परिवाराच्या सहकार्याने येथील विकास कामे झपाट्याने होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले व या सोहळ्याला शुभाशीर्वाद दिले.

यावेळी निफाड येथील दत्ता महाराज वैद्य यांचे किर्तन झाले. किर्तनानंतर उपस्थित हजारो भाविकांना रेडे परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी अगस्ती भक्त व अगस्ती तरुण मंडळाच्या सर्व सदस्य सेवेकऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







