आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
प्रभात फेरी

नेवासा – राजस्थान जोधपूर येथील गोवत्स परमपूज्य राधाकृष्णजी महाराज आणि देवगड गुरूदेव दत्त पिठाचे प्रमुख राष्ट्रसंत महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या निर्देशानुसार नेवासा शहरात पहाटेच्या सुमारास “रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी”असा जप करत जाणाऱ्या नेवासा येथील प्रभात फेरीला आज चौदा वर्षे पूर्ण झाले असल्याने प्रभात फेरीतील सर्व सेवेकऱ्यांनी माऊली चरणी नतमस्तक होऊन पैस खांबाचे दर्शन घेतले.

         तब्बल चौदा वर्षांचा हा कालावधी पूर्ण करत पंधराव्या वर्षात पदार्पण करणारी ही प्रभात फेरी आज नेवाशातील नागरिकांची श्रद्धा, निष्ठा आणि भक्ती जिव्हाळ्याचा विषय ठरली आहे. दररोज पहाटे ‘राम कृष्ण हरी’च्या अखंड नामजपाने संपूर्ण नेवासा नगरी पवित्र करणारी ही परंपरा अखंडपणे सुरू आहे.प्रभात फेरीच्या पहिल्या दिवशी हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. स्वतः गोवत्स राधाकृष्ण महाराज यांच्या उपस्थितीत नेवासा नगरीत पहिली फेरी निघाली होती त्या मंगल क्षणापासून या उपक्रमाला भक्तिभावाची भक्कम पायाभरणी लाभली.

प्रभात फेरी

     आठवडयात प्रत्येक दिवशी नेवासा शहरातील विविध भागांतून फिरणारी ही “राम कृष्ण हरी”नामजप करणारी प्रभात फेरी समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारी ठरली आहे. या फेरीचे ज्येष्ठ व सन्माननीय सदस्य म्हणून बाबुराव ढवळे सर,डॉ. मुरलीधर कराळे सर,अनंतराव नळकांडे,अंबादास देशपांडे,सुनिल मैदाड,अर्जुन रणमले, चंद्रकांत डाके,कुमार शिंदे,अशोक गरुटे,ज्ञानेश्वर वाघ, गरुटे मावशी आणि रोहिणी मापारी हे कार्यरत आहेत.

प्रभात फेरी

           चौदा वर्षपूर्तीच्या निमित्ताने ज्ञानेश्वर मंदिर प्रांगणात मंदिराचे मार्गदर्शक वेदांताचार्य हभप देविदास महाराज म्हस्के यांनी शुभाशीर्वाद दिले.उद्योजक उमेश शिंदे यांच्या हस्ते प्रभात फेरीतील सर्व सन्माननीय वारकरी सदस्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच या प्रभात फेरीच्या सर्व सदस्यांना पुढील अनंत काळासाठी प्रेस क्लबच्या वतीने अध्यक्ष गुरुप्रसाद देशपांडे यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रभात फेरी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

प्रभात फेरी
प्रभात फेरी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

प्रभात फेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!