घोडेगाव – सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.
सदर आदेशानुसार किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार दिपक घाटकर, ह्रदय घोडके, सोमनाथ झांबरे, भिमराज खर्से, शाम जाधव, प्रशांत राठोड, मनोज साखरे, योगेश कर्डीले यांचे पथक तयार करुन सदर पथकास नेवासा तालुक्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.
दि. 4 रोजी नमुद पथक हे सोनई पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत सतिष विश्वनाथ कसबे रा.मोरेचिंचोरे, ता.नेवासा हा त्याचे कमरेला गावठ्ठी कट्टा लावुन मोरेचिंचोरे गावचे शिवारात ओढ्याजवळ फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने बातमीतील ठिकाणी असलेल्या ओढ्याजवळ सापळा लावला असता. तेथे एक इसम संशयीतरित्या फिरत असतांना दिसुन आला.
सदर इसमास ताब्यात घेवुन त्यास अधिक विचार पुस केली असता त्याचे नांव सतिष विश्वनाथ कसबे वय- 30 वर्षे रा. मोरेचिंचोरे ता.नेवासा असे असल्याचे सांगितले. सदर इसमाची झडती घेतली असता त्याचे कमरेला 1) 30,000/- रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल (अग्निशस्त्र), 2000/-रु कि. चे दोन जिवंत काडतुसे, असा एकुण 32,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला आहे. ताब्यातील इसमाकडे अग्निशस्त्र कोणाकडुन आणले याबाबत विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदरचे अग्निशस्त्र राहुरी तालुक्यातील मांजरी येथील अमोल रावसाहेब विटनोर(फरार) याचेकडुन आणले असल्याचे सांगितले आहे.
ताब्यातील इसमाविरुध्द पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ झांबरे यांचे फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाणे गु.र.नं. 86/2026 आर्म ऍ़क्ट 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने मागिल एका महिन्यात 05 गावठ्ठी कट्टे व 09 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असुन यापुढे गावठ्ठी कट्टे कब्जात बाळगणारे इसमांचे माहिती काढुन त्यांचेविरुध्द कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.








