आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
सोने

नेवासा – स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून १५ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना नेवासा पोलीस ठाणे हद्दीत नेवासा-श्रीरामपूर रोडवर घडली असून याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने आरोपीला जेरबंद केले आहे. अटक केलेल्या आरोपपैिकी एक देवगावचा तर दुसरा नागफणी वस्ती येथील आहे.

सोने

याबाबत अरविंद सिध्दप्पा हलसांगी (रा. वाघोली जि. पुणे) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शेखर उर्फ बंटी संजय पाडळे रा. देवगाव ता. नेवासा याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून किरण काळे रा. नेवासा तसेच ८ ते १० इसम यांनी संगनमत करुन स्वस्तात सोने देतो असे सांगून नेवासा येथे नेवासा-श्रीरामपूर रोडवर हॉटेल शिवम जवळ कच्च्या रस्त्याने उजव्या बाजुला कांद्याचे चाळीमध्ये बोलावून घेवून माझे मित्र आदित्य नागटिळे व अशोक शहाणे व मला काठीने व लाथाबुक्याने मारहाण करुन काठी व धारदार शस्त्राचा व पिस्तूलचा धाक दाखवून माझे रोख रक्कम अॅपल कंपनीचा मोबाईल व माझ्या मित्राचे २ विवो मोबाईल २ नग सोन्याच्या अंगठ्या असा एकूण १५ लाख ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने काढून घेतला.

स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली हरिष भोये, पोलीस अमलदार सोमनाथ झांबरे, दीपक घाटकर, फुरकान शेख, बिरप्पा करमल, बाळासाहेब नागरगोजे भिमराज खसे, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक भगवान धुळे, अरुण मोरे यांचे पथकाने दरोड्याचे गुन्ह्यामधील आरोपींची माहिती संकलित करुन व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती काढत असतांना पथकास २८ फेब्रुवारी रोजी गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा हा शेखर उर्फ बंट्टी संजय पाडळे रा. देवगाव ता. नेवासा याने त्याचे इतर साथीदारास केला असून तो नेवासा, माळीचिंचोरा फाटा परिसरात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. पथक नेवासा ते छत्रपती संभाजीनगर जाणारे रोडवर माळी चिंचोरा फाटा परिसरामध्ये सापळा रचून थांबले असता पथकास सदर परिसरात दोन इसम संशयीतरित्या फिरताना दिसून आले.

सोने

तेव्हा पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे शेखर उर्फ बंट्टी संजय पाडळे (वय ३२) रा. देवगाव ता. नेवासा, व किरण बंडु काळे (वय २९) रा. नागफणीवस्ती नेवासा असे असल्याचे सांगितले. ताब्यातील शेखर उर्फ बंट्टी संजय पाडळे याने सदर गुन्हा हा त्यांचे साथीदार भाऊसाहेब छगन भोसले रा. नेवासा व सचिन उर्फ गटण्या पवार रा. खळवाडी, नेवासा खुर्द व त्याचे ८ ते ९ अनोळखी साथीदार यांचेसह केल्याची कबुली दिली आहे. आरोपीचे कब्जातुन गुन्ह्याचे वेळी वापरलेला ३५ हजार रुपये कट्टा व दोन किमतीचा एक गावठी कट्टा जिवंत काडतुसे, ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल तसेच ६ लाख रुपये रोख रक्कम असा एकूण ६ लाख ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सोने

सदर घटनेबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गु.र.नं. १६३/२०२६ भारतीय न्याय सहिता २०२३ चे कलम ३१० (२), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील घटनेतील आरोपी किरण बंडू काळे याच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात ३, राहाता पोलीस ठाण्यात ३, कोपरगाव पोलीस ठाण्यात २ तसेच एमआयडीसी अहिल्यानगर व गंगापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे एक असे एकूण १० गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास नेवासा पोलीस ठाणे हे करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सोने
सोने
सोने

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सोने

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!