पर्यावरण कर

नेवासा- अर्थसंकल्पात जुन्या प्रदूषणकारी वाहनावरील पर्यावरण करात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार बीएस ४ आणि त्याखालील वायू प्रदूषणाची मानके असलेल्या परिवहनेतर खासगी दुचाकी वाहनावर २ हजार रुपयांवरुन ४ हजार रुपये, हलकी मोटर वाहने ३ हजार वरुन ६ हजार रुपये तर डिझेल हलक्या मोटर वाहनांवर ३५०० रुपयांवरून ७ हजार रुपये करवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.

पर्यावरण कर

दरम्यान, नव्या वाहन खरेदीला प्रोत्साहन म्हणून जुने वाहन निष्कासित करुन नवीन वाहन खरेदी केल्यास मोटार वाहन करात १५ टक्के सूट, नवीन वाहने खरेदी करताना बीएस-४ आणि त्यावरील प्रदूषण मानके असलेल्या वाहनांना मोटर वाहन करात १६ टक्के, तर बीएस-३ आणि त्याखालील प्रदूषण मानके असलेल्या वाहनांना मोटर वाहन करात ३० टक्के सूट देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. याशिवाय क्रेन आधारित वाहनांच्या किंमतीवर ७ टक्के प्रमाणे एकरकमी कर होता. परंतू मोठ्या किंमतीची वाहने अन्य राज्यात नोंदणी होत असल्याने कराची कमाल मर्यादा ३० लाख रुपये प्रस्तावित करण्यात आली आहे. वाहन वितरकास व्यवसाय प्रमाणपत्र ५ वर्षाचे आणि कर मात्र १ वर्षाचा असल्याने त्याच्या दरात सुधारणा करण्यात आल्याचे अर्थसंकल्पात म्हटले आहे. मुद्रांकावर दस्त निष्पादित केल्यास अपराध सिद्धीनंतर सक्तमजुरी आणि शास्तीच्या रकमेत फेररचना करताना ती ५ हजार रुपयांवरून १ लाख रुपये करण्यात आली आहे.

पर्यावरण कर
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पर्यावरण कर
पर्यावरण कर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पर्यावरण कर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!