अत्याचार

नेवासा –नेवासा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस. एस. पाटील (सध्या कार्यरतः मेढा पोलीस ठाणे, तालुका जावळी, जिल्हा सातारा) हे सुनावणीकामी गैरहजर राहिले. – त्यामुळे नेवासा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश. आर. आर. हास्तेकर यांनी त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढले आहे.

नेवासा तालुक्यातील सुरेगाव दही येथे दि. २८ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी साडेदहा वाजता परसराम जनार्दन गणगे यांच्यासह २३ व्यक्तींनी फिर्यादी गोरक्षनाथ गणगे वगैरे १० व्यक्तींना जमिनीच्या वादातून गंभीर मारहाण केली होती. यात मच्छिंद्र बाजीराव गणगे यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वर नमूद व्यक्तींविरुद्ध नेवासा पोलिसांनी मुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपास पूर्ण करून नेवासा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

पोलीस

त्यानंतर या खटल्याची सुनावणी नेवासा सत्र न्यायालयात सुरू झाली होती. परंतु, सुनावणीकामी नेवासा पोलीस ठाण्याचे तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एस. एस. पाटील हे अनेक वेळा गैरहजर राहिले. जिल्ह्याचे विशेष सरकारी वकील अॅड. सुरेश लगड यांनी ही बाब नेवासा सत्र न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे सत्र न्यायालयाने तपासी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. पाटील यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढले. आहे.

या खटल्याची पुढील सुनावणी २३ मार्च २०२६ रोजी ठेवली आहे. या प्रकरणात विशेष सरकारी वकील अॅड. सुरेश लगड हे सरकार पक्षातर्फे काम पाहत आहेत, तर आरोपींतर्फे अॅड. जी. आर. काकडे हे काम पाहत आहेत.

पोलीस
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पोलीस
पोलीस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पोलीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!