घोडेगाव— जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोळे वस्ती येथे जागतिक महिला दिन आनंदात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर स्नेहा दराडे या होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कमल डोळे ह्या होत्या. याप्रसंगी गावातील महिलाचा ‘मनाचे श्लोक ‘पुस्तिका देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर स्नेहा दराडे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक सवयी व स्वच्छता याबद्दल माहिती दिली. तसेच गावातील महिलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले व वेळोवेळी करावयाच्या तपासण्या याबद्दल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थी मुख्यमंत्री सृष्टी डोळे व श्रुती डोळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नितीन पालवे यांनी केले. तसेच जागतिक महिला दिना विषयी माहिती शिक्षिका प्रतिभा सानप -पालवे यांनी दिली. या कार्यक्रम प्रसंगी पद्मावती डोळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुवर्णा डोळे, सुनिता डोळे, अर्चना डोळे, सोनल आव्हाड,कमल डोळे मुक्ता दराडे, प्रियंका दराडे,रूपाली, डोळे प्रणाली डोळे, राणी डोळे उपस्थित होत्या. प्रतिभा पालवे यांनी उपस्थितांचे आभार मानले..


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

