नेवासा(प्रतिनिधी)नेवासा तालुक्यातील देवगड येथे श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या शेकडो दिंडयांतील हजारो वारकऱ्यांना आमदार विठ्ठलराव लंघे पाटील मित्र मंडळ,मुरमे ग्रामस्थ व सरपंच अजय साबळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरबतांचे वाटप करण्यात आले.
देवगड मुरमे गावच्या प्रवेशद्वाराजवळच मोठा शामियाना उभारून थंडगार जारद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व सरबत वाटपाचे नियोजन सरपंच अजय साबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते यावेळी आलेल्या दिंडी चालकांसह दिंडीचे नेतृत्व करणाऱ्या महाराज मंडळींचे संतपूजन व सन्मान सरपंच अजय साबळे पाटील व मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आला

सलग दुसऱ्या वर्षी आम्ही श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पुण्यतिथी सोहळयासाठी पायी दिंडीमध्ये हजारो वारकऱ्यांना गुरुवर्य श्री भास्करगिरी बाबा व स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या प्रेरणेने
थंडगार पिण्याच्या पाण्यासह सरबतांचे वाटप आम्ही सर्व मित्र मंडळी करत असतो याचे समाधान वाटते, वारकऱ्यांची सेवा त्यानिमित्ताने आमच्या कडून घडत असून दरवर्षी हा उपक्रम आम्ही मोठ्या प्रमाणात राबवत रहाणार असल्याचे उपक्रमाचे प्रमुख देवगड सेवेकरी अजय साबळे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले

वारकऱ्यांना सरबत वाटपाच्या या अभिनव उपक्रमासाठी शंकर चरवंडे,अर्जुनदादा वरखडे,दत्तात्रय वरखडे,अर्जुननाना वरखडे,सुदाम चरवंडे,अमोल वरखडे, प्रकाश वरखडे,मारुती साबळे,शरद पल्हारे,विठ्ठल मोरे, सुजित साबळे,अरुण वरखडे, किरण वरखडे,अजय वरखडे,नामदेव वरखडे,किरण चरवंडे,अक्षय वरखडे, दत्तात्रय साठे, दिगंबर लोखंडे, किसन चरवंडे आदींनी सहभाग नोंदवला.आलेल्या वारकऱ्यांनी सरबत वाटप उपक्रमाचे कौतुक करत संयोजकांना धन्यवाद दिले

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

