
आपला जिल्हा – जिल्हा रुग्णालयात, केलेल्या दिव्यांग वैद्यकीय पडताळणीत दिव्यांगत्वाचे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा कमी आढळल्याने झेडपीच्या १५ कर्मचाऱ्यांवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यात ११ शिक्षक, ३ परिचर, तर एका आरोग्य सेवकाचा समावेश आहे. यातील आठ जणांची नियुक्तीच दिव्यांग प्रमाणपत्रावर असल्याने त्यांच्यावर थेट फौजदारी कारवाई होणार आहे.

राज्यातील सर्वच शासकीय विभागांतील दिव्यांग कर्मचारी तपासणीचे आदेश दिव्यांग मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये दिले होते. दरम्यान अपंगाच्या पडताळणीबाबत राज्य पातळीवरून दिव्यांग विभागाचे सचिव मुंडे यांनी तपासणीचे आदेश काढले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेने तालुकानिहाय शिबिरे घेऊन दिव्यांग कर्मचाऱ्यांची तपासणी केली. त्यातून काही कर्मचारी जिल्हा रूग्णालयात, तर काही कर्मचारी नाशिक येथील उपसंचालक कार्यालयाकडे वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले होते.

दरम्यान, जिल्हा रूग्णालयाने या कर्मचाऱ्यांना बोलावून प्रत्यक्ष तपासणी केली. त्यात १८ कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राचे प्रमाण ४० टक्केपेक्षा कमी आढळले. तसा अहवाल जिल्हा रूग्णालयाने जिल्हा परिषदेला पाठवला. जिल्हा परिषदेने या कर्मचाऱ्यांना नोटिसा पाठवून खुलासा मागवला. १८ पैकी १५ जणांचा खुलासा समाधानकारक नसल्याने त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बुधवारी दिले. यातील एकाचा खुलासा मान्य करण्यात आला. एकाची पुनश्च पडताळणी करण्यात येणार आहे, तर एकाच्या खुलाशाची पडताळणी केली जाणार आहे.

जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या तपासणीत पहिल्या टप्प्यात १८ जणांच्या प्रमाणपत्रावर शंका उपस्थित झाली होती. यातील १५ दोषी आढळले असून एकाचा खुलासा मान्य करण्यात आला असून दोघांची पुन्हा पडताळणी करण्यात येणार आहे. यासह नाशिक आरोग्य उपसंचालक कार्यालयात तपासणी पाठवलेल्या ४१ प्रमाणपत्रासह नगरच्या जिल्हा रूग्णालयातील तपासणीला गैरहजर असणाऱ्या १८ जणांना पुन्हा तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. यामुळे अद्याप ५९ जणांचा निकाल लागणे बाकी असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कारवाई झालेले कर्मचारी
समाधान घुगे (आरोग्य सेवक, कर्णबधीर व कायदेशीर कारवाईस पात्र), सुनील वाघ (मुख्याध्यापक, कर्णबधीर), प्रभाकर चोखंडे (परिचर, अस्थिव्यंग), दत्तात्रय फपाळे (मुख्याध्यापक, कर्णबधीर), वामन घाटपांडे (परिचर, अस्थिव्यंग व कायदेशीर कारवाईस पात्र), अतुल सातपुते (परिचर, अस्थिव्यंग), मंदा शिंदे (शिक्षक, कर्णबधीर व कायदेशीर कारवाईस पात्र), संगीता कदम (शिक्षक, अस्थिव्यंग), संजयकुमार बडे (शिक्षक, अस्थिव्यंग), वर्षा अकोलकर (शिक्षक, कर्णबधीर व व कायदेशीर कारवाईस पात्र), पुष्पलता खेडकर (शिक्षक, कर्णबधीर व कायदेशीर कारवाईस पात्र), सतीश लगड (शिक्षक, अस्थिव्यंग), सागर मोरे (शिक्षक, कर्णबधीर व कायदेशीर कारवाईस पात्र), विनयकुमार वाडेकर (शिक्षक, अल्पदृष्टी व कायदेशीर कारवाईस पात्र), संतोष लष्करे (शिक्षक, कर्णबधीर व कायदेशीर कारवाईस पात्र).

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

