नेवासा-देशात आणि राज्यात जनता महागाईने त्रस्त असताना इराण – अमेरिका युद्धाचे कारण देत महाराष्ट्र मध्ये गॅसची प्रचंड टंचाई व दरवाढ केल्याचे निषेधार्थ काँग्रेसने तहसीलदारांना निवेदन देत आंदोलन केले.
तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब पटारे व जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अभिजीत लुणिया यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने आज तहसीलदारांना निवेदन देत दरवाढ घटनेचा जाहीर निषेध केला. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,
महागाईने सर्वसामान्य जनतेचे जगणे आधीच कठीण झाले असताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने एलपीजी गॅसच्या किमती वाढवून पठाणी लुट करत आहे.

डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली युपीए सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती वाढल्या तरी त्याचा बोजा सामान्य जनतेवर पडू दिला नाही. सबसीडी देऊन जनतेला महागाईचे चटके बसू दिले नाहीत. युपीए सरकारच्या काळात घरगुती सिलेंडर ४०० जनतेवर पडू दिला नाही, रुपयांना मिळत होते, आता एका गॅस सिलेंडरसाठी ९०० रुपयांपेक्षा जास्त मोजावे लागत आहेत. सिलेंडर बुक करण्याचा कालावधीही १५ दिवसावरून एक महिन्याचा करण्यात आला आहे, यामुळे मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीही १९०० रुपयावर गेल्या आहेत तसेच या सिलेंडरचे रेशनिंग करण्यात येत आहे याचा मोठा फटका विद्यार्थी, कामगार, नोकरदार, ज्यांची घरच्या जेवण्याची सोय नाही अशा लोकांना बसत आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय वा व्यापारासाठी मोठ्या संख्येने लोकांना बाहेर जेवण करावे लागते, व्यावसायीक गॅसच्या किमती वाढवल्याने व त्याचे रेशनिंग केल्याने या खाद्यपदार्थांचे भावही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गॅसची टंचाई नाही असे सरकार सांगत असले तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी गॅसची प्रचंड दरवाढ झालेली आहे काही ठिकाणी अनधिकृतरीत्या गॅसचे पैसे वाढवून काळाबाजार केला जात आहे त्याचबरोबर अनेक व्यावसायिक हॉटेल मालकांना घरगुती गॅस सिलेंडर हे कमर्शियल च्या भावात काळ्याबाजाराने विकले जात आहे यामध्ये सर्वसामान्य जनतेची प्रचंड ससेहेलपट होत आहे. सर्वसामान्य जनता तसेच हॉटेल्स, खानावळी, खाद्य पदार्थ बनवणारे व बनवून विकणारे छोटे व्यावसायीक या सर्वांना गॅस सिलेंडर विना अडथळा सहजपणे उपलब्ध होईल याची प्रशासनाने व्यवस्था करावी. तसेच गॅस चा तुटवडा दाखवून होत असलेला काळाबाजार थांबवावा व सरकारने वाढवलेल्या किमती तात्काळ कमी कराव्यात ही विनंती निवेदनात करण्यात आली आहे या वेळी नेवासा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब पटारे जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत लुणिया, वसंतराव रोटे संदीप मोटे, रंजन जाधव, बाळासाहेब झावरे, संजय होडगर, इम्रान शेख आदीसह अनेक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

