ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी
ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी

नेवासा – ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी पायी पालखी सोहळा २०२६ या ऐतिहासिक सोहळ्याच्या नियोजनासाठी आज दि. १३ मार्च २०२६, शुक्रवार रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे पूर्वनियोजन बैठक उत्साहात संपन्न झाली.

ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंदिराचे महंत वेदांताचार्य देवीदासजी महाराज म्हस्के हे होते. या वेळी ह.भ.प. रामभाऊजी महाराज राऊत (विठ्ठल आश्रम, गंगापूर), सुदामदेव महाराज आदमाने, राजाराम महाराज तूवर, प्रवीण महाराज कोरडगावकर, श्रीराम महाराज झुंजुर्के, आदिनाथ महाराज भोगे, नंदकिशोर महाराज खरात, श्रीहरी महाराज वाघचौरे तसेच श्रीराम महाराज चोपडे यांच्यासह नेवासा तालुक्यातील विविध महाराज मंडळी उपस्थित होती.

ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी

याशिवाय पांडुरंग अभंग (अध्यक्ष, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान), ज्ञानोबा माऊली शिंदे (खजिनदार), विश्वस्त कैलास जाधव, कृष्णा पिसोटे तसेच पत्रकार मंडळी, वारकरी, दिंडी चालक-मालक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी

बैठकीत ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी पायी पालखी सोहळा २०२६ हा सोहळा श्रीक्षेत्र नेवासा ते श्रीक्षेत्र पंढरपूर दरम्यान पार पडणार असून त्यासाठी दिंडी व्यवस्थापन, वारकऱ्यांची सोय, निवास, भोजन, सुरक्षा व इतर आवश्यक नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी

हा पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी
ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!