निलेश लोखंडे
निलेश लोखंडे

नेवासा – एकादशी निमित्त श्री श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे रविवारी (दि. १५ मार्च २०२६) सकाळी ९ वाजता मंदिर संस्थानच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी जपत मंदिरात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग भाविकांच्या सोयीसाठी व्हीलचेअर भेट देणारे डॉ. निलेश शंकरराव लोखंडे यांचा संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.

निलेश लोखंडे

मंदिर समितीच्या विनंतीला मान देत डॉ. लोखंडे यांनी भाविकांच्या सेवेसाठी व्हीलचेअर प्रदान केली. त्यांच्या या सेवाभावी कार्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करत त्यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले.

निलेश लोखंडे

यावेळी नेवासा डॉक्टर असोसिएशनचे नवनिर्वाचित पदाधिकारी व सर्व सदस्यांचा देखील मंदिर समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी गुरुवर्य देविदास बाबा व संस्थानचे अध्यक्ष अभंग साहेब यांनी सर्व डॉक्टर असोसिएशनला विनंती केली की मंदिरात येणाऱ्या भाविक भक्त यांच्या साठी प्रथम उपचार म्हणून आपण छोटी ओपीडी सुरू करावी त्यासाठी आम्ही आपल्याला जागा व सर्व मदत उपलब्ध करून देऊ. कार्यक्रम प्रसंगी मंदिर विश्वस्त भिकाजी जंगले, माऊली शिंदे, सेवेकरी भैया कावरे, मा. सभापती रावसाहेब कांगुणे, शंकरराव लोखंडे, काकासाहेब शिंदे, सतीश गायके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

निलेश लोखंडे

तसेच डॉ. गळलिंबकर, डॉ. देशमुख, डॉ. नांदे, डॉ. वाघ मॅडम, डॉ. सांगळे मॅडम, डॉ. शंकर शिंदे, डॉ. संजय सुकाळकर, डॉ. गोरे आदींचीही कार्यक्रमास उपस्थिती होती.

एकादशीच्या पावन दिवशी झालेल्या या कार्यक्रमामुळे मंदिर परिसरात भक्तिमय व उत्साही वातावरण निर्माण झाले होते.

निलेश लोखंडे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

निलेश लोखंडे
निलेश लोखंडे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

निलेश लोखंडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!