नेवासे फाटा (वार्ताहर): आग्या मोहळाच्या हल्ल्यात बाबासाहेब बाळासाहेब चावरे (वय ४३, दिघी शिवार, रा. नजीक चिंचोली, हल्ली. रा. नेवासे फाटा ता. नेवासे) या पोकलेन मालकाचा मृत्यू झाला असून चालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. ही घटना शनिवारी दुपारी नेवासे तालुक्यातील दिघी शिवारात घडली आहे.
याबाबत माहिती अशी की, बाबासाहेब चावरे हे शनिवारी त्यांच्याच दिघी शिवारातील शेती लागत असलेल्या ताकवणे यांच्या शेतात त्यांच्या पोकलेन शेततळे खोदण्याचे काम चालू होते.

शेत तळ्याचे काम आटोपल्यावर आंब्याचे झाड परिसरात असलेले खड्डा बुजवत असतांनाच आंब्याचे आग्या मोहळ माशांनी बाबासाहेब चावरे यांच्यावर हल्ला चढविला. त्यावेळी पोकलेन केबिन मधून बाहेर आलेला चालकावरही रा. उत्तर प्रदेश (नाव समजू शकले नाही) माशांनी त्याच्यावर हल्ला चालविला.
दरम्यान, बाबासाहेब जीव वाचवण्यासाठी धावत असताना माशांनी पाठलाग करत कडाडून चावा घेत होत्या. त्यांनी जवळच असलेल्या शेततळ्याच उडी घेतली. मात्र, कमी पाणी असल्याने त्याचा माशांच्या हल्ल्यापासून सुटका करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. काही वेळाने त्यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी नेवासे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास तपासी अंमलदार संदीप ढाकणे हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

