कुस्ती

नेवासाफाटा (वार्ताहर): त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, त्रिमूर्तीनगर येथील विद्यार्थीनी व कुस्तीपटू गौरी नामदेव मुखेकर (एसवायबीए) हिची दि.१७ ते २० मार्च २०२६ दरम्यान होणाऱ्या ऑल इंडिया विद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा कुरुक्षेत्र विद्यापीठ, कुरुक्षेत्र येथे होणार असून तिची निवड सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या वतीने करण्यात आली आहे.

कुस्ती

गौरी मुखेकर हिने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर नेवासा तालुक्याचे तसेच त्रिमूर्ती महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरातून तीचे अभिनंदन केले जात आहे. गौरी मुखेकर हिला त्रिमूर्ती कुस्ती केंद्राचे प्रशिक्षक संभाजी निकाळजे, संजय यादव तसेच त्रिमूर्ती सीनियर कॉलेजचे फिजिकल डायरेक्टर नितीन चिरमाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल तीचे त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ॲड.सुमतीताई घाडगेपाटील, उपाध्यक्षा ॲड.स्नेहल चव्हाण – घाडगेपाटील, सचिव मनीष घाडगेपाटील, सहसचिव डॉ.श्रुती आमले – घाडगेपाटील, विश्वस्त चेतन चव्हाण पाटील, सीनियर कॉलेजच्या समन्वयक डॉ.अनुराधा गोरे, त्रिमूर्ती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चांगदेव आरसुळे, उपप्राचार्य प्रा.निकिता बर्गे, प्रा.संतोष जावळे, साईनाथ भवर, सोमनाथ खेडकर, नितीन चिरमाडे, अक्षय देवतरसे, राहुल बोरुडे, प्रवीण आवारे, गोरख गुंड, मंगेश वैरागरे, अनिकेत आरसुळे, पल्हारे, अभिषेक दरंदले, प्रा.योगिता गायकवाड, रीमा कराडे, भाग्यश्री कोल्हे, नूतन वंजारे, गायत्री ढाकीफळे, अमृता देवकर, माध्यमिक महाविद्यालयाचे प्राचार्य सोपान काळे, त्रिमूर्ती पब्लिक स्कूलचे प्राचार्य अरविंद देशमुख, त्रिमूर्ती इंटरनॅशनल स्कूल च्या प्राचार्या श्रीदेवी नायर, त्रिमूर्ती क्रीडा समन्वयक संजयसिंह चौहान यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

कुस्ती

त्रिमूर्ती संकुलामध्ये आर्चरी, रायफल शूटिंग, कुस्ती, कबड्डी, किक बॉक्सिंग, व्हॉलीबॉल, फुटबॉल, अथलेक्टिक्स आणि क्रिकेट या विविध क्रीडा प्रकारांसाठी उत्तम प्रशिक्षण दिले जाते. गौरीला क्रीडा प्रशिक्षक अभिजीत दळवी, छबुराव काळे, महादेव काकडे, अशोक पानकडे, नितीन चिरमाडे, साहेबराव दाणे, मुकेश जाधव, गणेश शिंदे, निलेश पैठणे, राहुल शेळके, शैलेश दाणे, गौरव दाणे, समीर शेख यांचेही मार्गदर्शन लाभले आहे. गौरी मुखेकर हिच्या या निवडीमुळे नेवासा तालुक्यासह त्रिमूर्ती संकुलाच्या क्रीडा परंपरेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

कुस्ती
कुस्ती

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कुस्ती
कुस्ती

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कुस्ती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!